क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहिल्यानगर:-अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या ग्रो-इन्व्हेस्टर स्टर कंपनी विरुद्ध केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना ठेवी परत, संभाव्य फसवणूक टळली.

पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अहिल्यानगर:-अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या ग्रो-इन्व्हेस्टर स्टर कंपनी विरुद्ध केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना ठेवी परत, संभाव्य फसवणूक टळली.

 अहिल्यानगर प्रतिनिधी आदिनाथ कडू

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सामान्य जनतेस अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे अमिष दाखवून इन्व्हेस्टर कंपन्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी विविध ठिकाणी संबंधित पोलिस स्टेशनला यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या ग्रो-इन्व्हेस्टर कंपनीचा पोलिसांचे अत्यंत सतर्कतेने पर्दाफाश केला आहे व या धाडसी कारवाईमुळे अनेक नागरिकांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळाले असून अनेक नागरिक सदर फसवणुकीत पैसे बुडण्यापासून वाचले आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, ग्रो- इन्व्हेस्टर कंपनी, भोकर, ता. श्रीरामपूर शिवारात अहिल्यानगर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या रकमा स्वीकारण्यात येत आहे. व त्यामध्ये अनेक नागरिक पैसे गुंतवणूण त्यांची फसवणूक होत आहे. अशी बातमी मिळाल्याने कोणतीही तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेवून श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर यांनी श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीरामपूर यांचे अधिपत्याखाली अपर पोलिस अधीक्षक, कार्यालयातील पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच श्रीरामपूर तालुका पो.स्टे. व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सदर ठिकाणी शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेशित केले.

पथकाने दिनांक २६/२/२०२५ रोजी नमूद ठिकाणी पंचासह छापा टाकला असता संदीपराज मोहिनीबाई कपाटे, वय ३६ वर्षे, रा. हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर हा मिळून आला त्यास पथकाने त्यांची ओळख सांगून त्याचे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्याचेकडे कोणताही लोकांकडून पैसे स्वीकारण्याबाबतचा परवाना नसलेबाबत सांगितले. त्यानंतर पथकाने त्यास झडतीचा उद्देश सांगून त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता त्याचे घरामध्ये ९ पासबुक, १० चेकबुक, १ हिशोब नोंदवीलेली वही, १ अॅपल कंपनीचा लॅपटॉप, ३ कॉम्प्युटर स्क्रिन, २ पेन ड्राईव्ह, १ कॅश काऊंन्टींग मशीन, २ तिजोरी, ३ वॉकीटॉकी, १ H.H.M.D. व १,०४,६००/- रुपये रोख रक्कम असे मिळून आले असल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.

सदर प्रकरणात पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः फिर्यादी होऊन *श्रीरामपूर तालुका पो.स्टे. गु.र.नं. ०५/२०२६ भा.न्या.सं.कलम ३१८(४), ३(५)* अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल होताच आरोपीने कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी स्वतः त्या-त्या ठेवीदारांना ठेवी परत केल्या आहेत. तसे ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहे. अन्य ठेवीदारांचे देखील जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून त्यांना देखील ठेवी परत केल्या जात आहेत. सदर तपासामध्ये आरोपींकडून अद्याप पावेतो *एक कोटी रुपये पेक्षा अधिक* रकमेच्या ठेवी परत केल्या आहेत. तसेच सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून या व्यतिरिक्त देखील काही ठेवीदारांच्या रक्कम परत मिळाल्या नसल्यास त्यांनी पोलिस निरीक्षक, श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.

सदर ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेला हा आर्थिक गैरव्यवहार श्रीरामपूर पोलिसांचे सतर्कतेमुळे रोखण्यात आला आहे. त्यामुळे हा घोटाळा अधिक मोठा होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी अशा अनेक कंपन्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे *ग्रो-इन्व्हेस्टर* कंपनीच्या जाळ्यात अडकणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांचे संरक्षण झाले आहे.

तरी सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी अधिकृत परवान्याची खात्री करावी. अशा प्रकारे अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून कोणीही फसवणूक झाली असेल किंवा तसा प्रयत्न होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीरामपूर, पोसई सतिष डौले, पोसई दादाभाई मगरे, पोहेकाॅ दादासाहेब लोंढे, पोना संदीप दरंदले, पोकाॅ सहदेव चव्हाण, पोकाॅ अशोक गाढे, पोना दादासाहेब गुंड, पोना अनिल शेंगाळे, मपोकाॅ पूजा भावसार, मपोकाॅ अरुण पवार, मपोकाॅ मीरा सरग यांनी केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button