कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागठाणे:-(सातारा)- “डिजिटल शेतीकडे नागठाण्याची दमदार वाटचाल!” 

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे:-(सातारा)- “डिजिटल शेतीकडे नागठाण्याची दमदार वाटचाल!”

 सातारा प्रतिनिधी महेश मोहिते

कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी महाविस्तार एआय अ‍ॅप कॅम्प नागठाणे येथे उत्साहात पार पडला.
सातारा तालुक्यातील नागठाणे गावात पीएम किसान व नमो सन्मान योजनेतील सहभागी असलेल्या, परंतु अद्याप कृषी महाविस्तार एआय अ‍ॅप नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये नागठाणे मंडल कृषी अधिकारी श्री. संतोष चव्हाण यांनी शेतकरी बांधवांना एआय अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे, शेतीसाठी मिळणारी तांत्रिक माहिती, शासकीय योजना व मार्गदर्शन याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला सातारा पंचायत समिती सदस्य श्री. संतोष साळुंखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री. दत्तात्रय साळुंखे (तात्या), नागठाणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सचिन साळुंखे पाटील, माजी व्हा. चेअरमन श्री. गोरखनाथ यादव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. चंद्रकांत महाडिक यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाला नागठाणे गावासह पंचक्रोशीतून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याच वेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे यांचे स्वागत करून त्यांचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना लाभले.
“तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीचा विकास – नागठाणे गावाचा नवा विश्वास!”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button