सातारा:-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार साताऱ्यात युवक संघटन बळकट करण्याचा निर्णय.
पत्रकार शुभम बल्लाळ सातारा तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार साताऱ्यात युवक संघटन बळकट करण्याचा निर्णय.

सातारा तालुका प्रतिनिधी शुभम बल्लाळ
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा (पश्चिम) येथे युवक संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष मा. दयानंद माने, सातारा जिल्हा महासचिव मा. निलेशजी लाड, सातारा जिल्हाध्यक्ष युवक मा. अमोल गंगावणे तसेच इतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयु. शुभम जयंत बल्लाळ यांची जिल्हा युवक संघटक पदावर एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शुभम बल्लाळ यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. युवकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
नवीन जबाबदारी स्वीकारताना शुभम बल्लाळ यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, वंचित बहुजन आघाडीचे विचार व धोरणे युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजाच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.




