आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-पर्यटन नगरी महाबळेश्वर रविवार दिनांक ८ मार्च रोजी बंद करण्याची स्थानिकांची घोषणा…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्राध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) महाबळेश्वर:-पर्यटन नगरी महाबळेश्वर रविवार दिनांक ८ मार्च रोजी बंद करण्याची स्थानिकांची घोषणा…

 सातारा प्रतिनिधी अजित जगताप

महाबळेश्वर दि:
पश्चिम महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त केलेल्या थंड हवेचे ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर नगरी होय. या नगरीच्या नागरी सुविधांबाबत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक हातबल झालेले आहेत. या विरोधात आता महाबळेश्वर बंद ची हाक दिल्यामुळे या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक महिला दिन रविवार दिनांक ८ मार्च रोजी सर्वपक्षीय महाबळेश्वर बंद ठेवण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खास बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

महाबळेश्वर मध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे. कर भरणा करूनही नागरिकांना त्या प्रमाणात नागरिक सुविधा मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले आश्वासन पाळले जात नाही. परिणाम पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता आणि पर्यटन सुविधा पूर्णपणे कोलमोडून पडलेले आहे. अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. रस्त्यात खड्डे पडले आहेत. टोल भरूनही नागरी सुविधा मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने महाबळेश्वरच्या पर्यटनाला सर्वात मोठा फटका बसला आहे.
काही व्यवसायिक अक्षरशः कर्जबाजारी झालेले आहेत. व्यवसाय वाढीसाठी प्रशासनाने नागरी सुविधा दिल्या पाहिजेत. करदात्या नागरिकांचा अधिकार आहे. असे नमूद करण्यात आले आहे. अनेक पर्यटक गैरसोयीचा अनुभव घेतल्यामुळे महाबळेश्वरकडे येणे टाळत आहेत . स्थानिक व्यापारावर आणि पर्यटनाशी निगडित अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. सामान्य घोडेवाल्यांना सुद्धा घोड्यावर फेरफटका मारणारे पर्यटक भेटत नाहीत. तशी अवस्था पर्यटकांना गाईड करणाऱ्या गाईड लोकांची झाली आहे .काहींचे तर उपजीविकेचे साधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
याबाबत आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री व या भागातील मदत व पुनर्वसन मंत्री तसेच खासदार व संबंधितांनी लक्ष घालावे. यासाठीच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक ८ मार्च रोजी महाबळेश्वर बंद पुकारला आहे. त्याबाबत लवकर तोडगा काढावा अशी मागणी पुढे आली आहे.

2) सातारा जि.प.स्विकृत सदस्य दिव्यांग प्रतिनिधी घ्यावा…

सातारा दि:- लोकशाही असलेल्या भारत देशात शिक्षण, नोकऱ्या, ग्रामपंचायतीपासून आरक्षणानुसार संधी दिली जाते. परंतू , दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षणापासून लांब ठेवले आहे. आता सातारा जिल्हा परिषदमध्ये स्विकृत सदस्य म्हणून दिव्यांगांचा प्रतिनिधी म्हणून अमोल निकम यांना संधी द्यावी .अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांकडून होत आहे.
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिव्यांग बांधवांसाठी अनेक मोर्चे, रॅली, आंदोलने झाली. यामध्ये दिव्यांग बांधव अमोल निकम हे प्रामुख्याने सहभागी होतात. दिव्यांगांची जाण असलेला व दिव्यांग बांधवांना कोणतीही अडचण असेल तर तेथे उच्चशिक्षित असलेले निकम हे हजर असतात. दिव्यांग बांधवांच्या सर्व व्यथा माहित असून राजकीय आरक्षणापासून लांब असलेल्या दिव्यांग बांधवांचा आवाज प्रत्येक सभागृहात घूमून त्यांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी ते धडपड करत आहेत. सातारा जिल्हा परिषद मध्ये स्विकृत सदस्य म्हणून अमोल निकम यांना संधी मिळावी म्हणून तमाम दिव्यांग बांधवांना महाराजाच्या राजधानीत न्याय द्यावा अशी मागणी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आली.
दिव्यांग बांधव स्विकृत सदस्य असणे आवश्यक आहे.अलिकडच्या काळात दिवसेंदिवस दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यांच्या अडचणीवेळी नेहमी शासकीय कार्यालय मध्ये अमोल निकम हे पाठपुरावा करत असतात. म्हणूनच त्यांना सातारा जिल्हा परिषदेमध्ये स्विकृत सदस्य म्हणून संधी मिळावी. या साठी जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव एकत्र आले आहेत. अशी माहिती श्री अमोल निकम यांनी दिली आहे. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अजय पवार, अमोल भातुसे, धर्मेंद्र कांबळे शैलेश बोर्डे व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

3) साताऱ्यात आज शनिवारी कृषी महोत्सव आणि चार वाजता धुराळा उडणार…

सातारा दि: सातारा शहरात नवीन प्रशासन भवनच्या समोर गेल्या आठवड्यात पौष्टिक कडधान्य प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला होता. आज शनिवार दिनांक ७ मार्च ते सोमवार ९ मार्च २०२६ या कालावधीमध्ये कृषी महोत्सव शुभारंभ होत असून चार वाजता त्याचा धुराळा उडणार आहे. ग्रामीण भागात चांगल्या कामाचा धुराळा उडणार अशी बोलीभाषा आहे त्याचबरोबर मैदानातही धुराळा उडणार आहे. हे लक्षात आणून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागप्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना विभागीय प्रदर्शन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्यमहोत्सव सन २०२५-२६ अंतर्गत दि. ७ ते ९ मार्च २०२६ सकाळी १० ते सायं. ८ पर्यंत सातारा पोलीस कवायत मैदान, पारंगे चौक,प्रशासकिय इमारती शेजारी, सातारा. या ठिकाणी भरवण्यात आली आहे स्टॉलची उभारणी झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातून ३०० स्टॉलची सुसज्ज उभारणी झाली आहे. या महोत्सवाची जोरदार तयारी केली असली तरी कडक उन्हामध्ये सावली निर्माण केली आहे. पण, सातारा पोलीस कवायत मैदानावरील मातीचा धुराळा चार वाजता उडणार आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे सकाळी या महोत्सवासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये बळीराजाला खुश करण्यासाठी दोन लाखापर्यंत चे पीक कर्ज माफ पायाभूत सुविधांना मुक्त असते निधी देण्यात आला आहे . तरी या साताऱ्यातील कृषी महोत्सवाला उडणाऱ्या धुराळाबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे शेतकरी संघटनेचे बाळकृष्ण चव्हाण, धन्यकुमार जाधव व क्रांतिसिंह नाना पाटील संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील यांनी सांगितले.
कृषी महोत्सव तथा कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सातारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे- पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. सर्वजण कौतुकास पात्र आहेत. सातारा नगरपालिकेच्या वतीने सदर मैदानावर पाणी मारल्यास धुराळा उडणार नाही. फक्त उद्घाटनाचाच कार्यक्रमाचा धुराळा उडावा. अशी अपेक्षा आहे.

कृषी प्रदर्शन तथा महोत्सवासाठी श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंह भोसले हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत.सातारा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.
उद्योजकांसाठी मार्गदर्शन म्हणून श्री. सुनिल महागंडे हे आखाती देशातील बाजारपेठ व निर्यात संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा प्राध्यापक श्री पांडुरंग धुरे हे अन्नपदार्थातील पोषणमूल्य व अन्न भेसळ ओळखणे तसेच श्री. सागर धनसिंग जाधव हे कांदा व हळद निर्यात आणि श्री. संतोष दिनकर बोबडे हे आरोग्य धनसंपदा महत्व व सोशल मिडीया द्वारे धान्याची विक्री याबाबत माहिती देणार आहेत. या महोत्सवाला सातारा जिल्ह्यासह तर भागातील शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कृषी महोत्सवामध्ये पोलीस कवायत मैदानावर वारा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराळा उडत असून शेतकरी वर्ग व ग्राहक यांना सुद्धा त्याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांशी मातीशी नाळ असते. परंतु मोठ्या प्रमाणात या धुराळामुळे कृषी महोत्सवाच्या ठिकाणी प्रदूषण होत आहे . साताऱ्यातील नवीन प्रशासन भवन च्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कृषी विभागाच्यावर असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत दखल घ्यावी. असे वाटत नसल्याने खऱ्या अर्थाने नियंत्रणाचा दुष्काळ असल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. याबाबत अनेक आणि नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई व जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button