आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुपा:-(पारनेर)-“चिमुकल्यांच्या कलाविष्काराने भारावले रांजणगाव; वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात”

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“चिमुकल्यांच्या कलाविष्काराने भारावले रांजणगाव; वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात”

सुपा, ता.पारनेर (प्रतिनिधी):
पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या आकर्षक कलाविष्काराने उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधूर व नयनरम्य नृत्य, ऐतिहासिक व विनोदी नाटिका तसेच प्रभावी अभिनयामुळे उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले. या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
पारनेरचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री. खंडेराव साबळे, उपाध्यापक श्री. संदीप पठारे, श्रीमती रुपाली गंधाडे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती चहाळ मॅडम, संगीता मॅडम आणि युकेजी वर्गाच्या शिक्षिका मन्यार मॅडम यांनी स्नेहसंमेलनाचे नियोजन व आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी रांजणगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी शिक्षकांना भरघोस सहकार्य केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रियंका ताई शिंदे पाटील, राणीताई यादव, प्राध्यापक शिंदे सर, सरपंच महेश काका देशमुख, उपसरपंच दादा शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राजक्ता चहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गावातील आजी-माजी सैनिक परिवार, तरुण मंडळाचे सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थांनी स्नेहसंमेलनासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे या स्नेहसंमेलनाचे रांजणगावसह पंचक्रोशी परिसरातून कौतुक होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button