आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिरूर:-शिरूरमध्ये ९ मार्च रोजी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर.

पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूरमध्ये ९ मार्च रोजी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर.

 शिरूर प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर Britannia Industries Limited यांच्या CSR उपक्रमांतर्गत आणि Sir Ness Wadia Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

हे शिबिर लहान मुले, गर्भवती महिला, किशोरी मुली तसेच सर्व नागरिक (पुरुष व महिला) यांच्यासाठी खुले असणार आहे.
शिबिरामध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन (HB) तपासणी, दंत तपासणी, डोळे तपासणी, मधुमेह (साखर) तपासणी, रक्तदाब तपासणी यांचा समावेश आहे. तसेच रुग्णांना मोफत औषधांचे वितरण देखील केले जाणार आहे.
हे शिबिर ब्रिटानिया डेअरी शेजारी, तापे मळा, तरडोबाची वाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन संभाजी कर्डिले युवा प्रतिष्ठान, तरडोबाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button