आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बावधनच्या श्री भैरवनाथ बगाड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; परवानगीशिवाय फ्लेक्स-बॅनर नाही, डीजे-डॉल्बीवर बंदी – नियम मोडल्यास कारवाईचा इशारा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

बावधनच्या श्री भैरवनाथ बगाड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; परवानगीशिवाय फ्लेक्स-बॅनर नाही, डीजे-डॉल्बीवर बंदी – नियम मोडल्यास कारवाईचा इशारा.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि. ०५ : मौजे बावधन ता. वाई येथे दिनांक ७ ते ९ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या श्री भैरवनाथ देवाच्या बगाड यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.५) सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत बावधन ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यात्रेचे सुयोग्य नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच विविध विभागांची तयारी याबाबत प्रशासनाने सविस्तर आढावा घेत कठोर सूचना दिल्या.

या बैठकीला उपविभागीय तथा प्रांताधिकारी योगेश खरमाटे तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सोनाली मेटकरी उपस्थित होते. त्यांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांकडून यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बावधन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या प्रतिनिधींनीही यात्रेदरम्यान येणाऱ्या अडी-अडचणी मांडल्या. त्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की बगाड यात्रेदरम्यान लावण्यात येणारे फ्लेक्स व बॅनर संबंधित प्रशासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लावू नयेत. परवानगीशिवाय फ्लेक्स-बॅनर लावल्यास किंवा त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
याशिवाय यात्रेत डीजे किंवा डॉल्बी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली असून पारंपारिक वाद्य वाजवताना आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यात्रेदरम्यान गावातील महिला-पुरुष मोठ्या प्रमाणावर मौल्यवान दागिने घालून देवदर्शनासाठी येत असल्याने गर्दीत चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले.
बगाड मार्गावर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कमिटीने स्वयंसेवक नेमून स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच बगाड कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
यावर बावधन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री भैरवनाथ बगाड यात्रा शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडून प्रशासनास पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
या बैठकीस विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, बावधन ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सुमारे २५० ते ३०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
(स्रोत : जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस ठाणे)

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button