शिरूर:-संगीतमय श्री शंकर महाराज चरित्र कथा सोहळा – शिरूर.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) शिरूर:-संगीतमय श्री शंकर महाराज चरित्र कथा सोहळा – शिरूर.

शिरूर प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे
शिरूर नगरीत प्रथमच श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित तीन दिवसीय संगीतमय चरित्र कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
विदुषी श्री गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या सुश्राव्य आणि मधुर वाणीतून महाराजांचे चरित्र ऐकण्याची सुवर्णसंधी शिरूरकरांना लाभली आहे.
वेळापत्रक
दिनांक: ५ मार्च २०२६ ते ७ मार्च २०२६ (गुरुवार ते शनिवार)
वेळ: दररोज सायंकाळी ७:०० ते १०:०० (कथा व भजन)
आरती व महाप्रसाद: रात्री १०:०० वाजता
📍 स्थळ
श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराज आदिनाथ मठ,
सूर्या पेट्रोलियमच्या मागे, रामलिंग रोड, शिरूर.
आयोजक
श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ (केडगाव) संचलित,
श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराज मठ, शिरूर.
“भक्ती आणि संगीताच्या या त्रिवेणी संगमात सहभागी होऊन महाराजांच्या आशीर्वादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.”
2) शिरूर:-कामगार क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण!

महिंद्रा लॉजिस्टिक लि.आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यातील तिसरा वेतनवाढ करार यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. हा करार लॉजिस्टिक उद्योगातील इतिहासातील सर्वात मोठा करार ठरला आहे आणि कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारा आहे. कंपनी व्यवस्थापनाचे आभार आणि कामगार बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन..!

यावेळी संघटनेचे मार्गदर्शक श्री. रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे,असोसिएट व्हा. प्रेसिडेंट एच. आर., कंपनी श्री. संजय गावडे, असिस्टंट व्हा. प्रेसिडेंट एच. आर. श्री. प्रदीप झोटिंग, कंपनीचे प्रतिनिधी श्री. धीरज सिंह, श्री. निंबा भांबरे, श्री. नामदेव टाचतोडे, श्री. राहुल भागवत आदी उपस्थित होते.
कामगारांनी आनंद व्यक्त करण्यासाठी पेढे वाटले आणि फटाके फोडले. हा करार कामगारांच्या हक्कांचा मजबूत दाखला असून, उद्योगातील मानवी विकासाला नवी दिशा देणारा ठरला आहे. “कामगार हे फक्त कंपनीचे आधारस्तंभ नाहीत, तर उद्योगाचा आत्मा आहेत. सुरक्षित, संतुष्ट आणि प्रोत्साहित कामगारांमुळे कंपनीचे यश दृढ होते. हा करार कामगारांच्या मेहनत आणि योगदानाची खरी कदर करण्याचा ठळक दाखला आहे, अशी माझी भावना आहे.
करारातील प्रमुख बाबी :
1. एकूण पगारवाढ: ₹15,500/- (CTC मध्ये)
2. रजा सुधारणा: सर्वांसाठी ३ दिवसांची वाढ
3. बोनस: ₹43,800 – ₹59,100/-
4. ग्रुप एक्सीडेंट व टर्म इन्शुरन्स: ₹5 लाख
5. उत्पादन वाढ: पहिल्या तीन वर्षांत ७%
6. कराराचा कालावधी: ०१/०३/२०२६ – ३१/०८/२०२९
7. करार वेळेत पूर्ण होण्याबद्दल सर्व कामगारांना बक्षीस: ₹7,500/-
कामगार हिताचा विचार म्हणजे… स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना..!




