पारनेर:-कामगारांच्या हक्कांसाठी ठाम पाऊल – दीपक ठोंबरे यांची अध्यक्षपदी निवड.
पत्रकार सार्थक काळे पारनेर तालुका कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पारनेर:-कामगारांच्या हक्कांसाठी ठाम पाऊल – दीपक ठोंबरे यांची अध्यक्षपदी निवड.

पारनेर प्रतिनिधी सार्थक काळे
पारनेर | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी (भाजप) चे युवा नेते दीपक ठोंबरे यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (पारनेर तालुका) या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल महाराष्ट्र चे अध्यक्ष विजय हरगुडे तसेच संघटनेचे संस्थापक अनुप मोरे यांनी जाहीर केली. त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
दीपक ठोंबरे हे पारनेर तालुक्यातील यादववाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले कार्यकर्ते असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. युवकांचे मोठे संघटन उभे करत त्यांनी तालुक्यात पक्षकार्याला गती दिली आहे. ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून माथाडी, ट्रान्सपोर्ट व सुरक्षा रक्षक कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
यावेळी पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी ठोंबरे यांचा सत्कार करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे तालुक्यातील कामगार विभागातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ही निवड पारनेर तालुक्यातील युवा कार्यकर्ते आणि कामगार वर्गासाठी प्रेरणादायी ठरली आहे.




