कराड:-काव्यात्मक भाषेतून’शोधांचा बोध’ करून देणारे पुस्तक विज्ञान प्रसारासाठी अतिशय उपयोगी-चंद्रशेखर देशपांडे.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-काव्यात्मक भाषेतून’शोधांचा बोध’ करून देणारे पुस्तक विज्ञान प्रसारासाठी अतिशय उपयोगी-चंद्रशेखर देशपांडे.

कराड:- काव्यात्मक भाषेतून शास्त्रज्ञांच्या ‘ शोधांचा बोध’ करून देणारे पुस्तक विज्ञान प्रसारासाठी व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असे प्रतिपादन शिक्षण मंडळ,कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी शिक्षण मंडळ,कराड संचालित स्व.रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेतील विज्ञान शिक्षिका ज्योती राऊत लिखित ‘शोधांचा बोध’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केले. या पुस्तकासाठी शिक्षण मंडळ कराडच्या व्हाईस चेअरमन अनघा परांडकर मॅडम यांनी प्रस्तावना लिहिली. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचीत्याने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ राजाराम कुंभार,मुख्याध्यापिका हेमलता जंगम,विठामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विश्रांती देसाई,शिक्षण विस्तार अधिकारी जमेला मुलाणी,विजया वितरण प्रकाशनाचे त्रिनेत्रनाथ जोशी, गुणवत्ता विकास समितीच्या सदस्या वृषाली पाठक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक, शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणात विज्ञान,तंत्रज्ञान अभियांत्रिकी व गणित(STEM) इत्यादी विषयांना कृत्रिम बुद्धिमत्ता विकसनामुळे मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होणार आहे,विद्यार्थ्यांची विज्ञानातील अभियोग्यता व गोडी विकसित करण्यासाठी विज्ञान शिक्षिका ज्योती राऊत सारख्या अनेक शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत ही बाब कौतुकास्पद आहे,लयबद्ध,यमक जुळणाऱ्या चालीमुळे विद्यार्थी शास्त्रज्ञांच्या शोधांचा बोध सहज आत्मसात करू शकतील,विद्यार्थी हे पुस्तक आवडीने वाचतील व कायमस्वरूपी लक्षात ठेवतील उपक्रमशील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये गती निर्माण होते,त्याचबरोबर शाळा व संस्था यांच्या नावलौकिकातही भर पडते असेही ते पुढील मार्गदर्शनात म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांनी केले.उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी सृष्टी आवळेकर हिने पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब देसाई यांनी तर सूत्रसंचालन सुचेता पाटील यांनी केले.




