आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-ज्ञानसाई इंग्लिश मिडीयम स्कूल, माळेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

ज्ञानसाई इंग्लिश मिडीयम स्कूल, माळेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

 श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे

माळेवाडी (RpS स्टार न्यूज प्रतिनिधी) – दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानसाई इंग्लिश मिडीयम स्कूल, माळेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. “उत्सव चिमुकल्यांचा – अविष्कार कला गुणांचा” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्रद्धानंदजी महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कैलास पवार (अध्यक्ष, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र), डॉ. चामे व महांकाळ (वडगाव, माळेवाडी ‘सर ला’), गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून दाद मिळवली. छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ हे नाटक विशेष ठरले. तसेच शेतकरी आत्महत्या आणि भारुडाच्या माध्यमातून वृक्षलागवड यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अभिनय, नृत्य व गायनातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमातील सर्व नृत्य, गायन व नाट्यप्रयोगांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले. शालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक रामनाथ जाधव तसेच प्रतिक्षा जाधव, माधुरी आव्हाड, मनीषा सांगळे, माधुरी वानखेडे, प्रकाश जाधव व जालिंदर जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली परंपरा, संस्कृती आणि लोककला जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पुढील पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचविण्याचे कार्य शाळेमार्फत प्रभावीपणे होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button