वाई:-किसन वीर महाविद्यालयात दि. ४ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

वाई दि.1
किसन वीर महाविद्यालयात दि. ४ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे माजी प्राचार्य श्री. रविंद्र येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष श्री. मदनदादा भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी तसेच सर्व संचालक, सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी आजी-माजी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर, कार्याध्यक्ष प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे व क्रीडा अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांनी केले आहे.




