खटाव:-वडूज नगरीत श्री.भैरवनाथ यात्रा जल्लोष व उत्साहात साजरी
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
वडूज नगरीत श्री .भैरवनाथ यात्रा जल्लोष व उत्साहात साजरी.
(अजित जगताप)
वडूज दि:
नाथ साहेबांच्या नावाने सालाबाद प्रमाणे वडूज ता. खटाव या ठिकाणी श्री भैरवनाथ देवाची यात्रा दि:१२ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत होऊ घातलेली आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असून ही यात्रा जल्लोष व उत्साहात साजरी होत आहे.
भव्य बैलगाडी शर्यत, भैरवनाथ देवाचा हळदी समारंभ, भैरवनाथ देवाचे लग्न समारंभ ,रुकवत, नामांकित गोंधळ यांचा कार्यक्रम झाला.
महाप्रसाद, श्री भैरवनाथ देवाची घोड्यावरून मिरवणूक, नाट्यरूपी भारुड कार्यक्रम, श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक, श्री चा छबिना, श्री भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणूक ,कुस्तीचे जंगी आखाडा आणि सर्वात आकर्षण ठरले म्हणजे नाथाची खीर महाप्रसाद आणि उद्या धुमाकूळ हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ वडूज त्याचप्रमाणे महाप्रसाद वाटप करण्यासाठी श्री निलेश जाधव (तात्या) श्री. माने सर ,डॉ. महेश माने व नाथ साहेब फाउंडेशन ,वडूज व अनेक मान्यवरांनी आपलं योगदान देऊन या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत. नाथ साहेबांच्या नावाने चांगभलंचा गजर करत ही यात्रा संपन्न होत आहे. गेले दोन वर्ष करून काळात यात्रा भरली नाही. परंतु, यंदाच्या काळी श्रीनाथ जोगेश्वरी कृपेने ही यात्रा यशस्वी झाली असून सर्व दानशूर ,वर्गणीदार यांचे भैरवनाथ यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानलेले आहेत .नाथाची खीर महाप्रसादाचे आकर्षण ठरले असून खिरीचा तीन क्विंटल आस्वाद भाविकांनी घेतला आहे. खटाव, कोरेगाव, माण, सातारा तालुक्यातील भाविकांनीही नाथाची खीर प्रसाद म्हणून सोबत घेऊन गेलेले आहेत. हा खीर प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु, या ठिकाणी सर्वांना मुबलक प्रमाणात खीर वाटप करून चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.
———————————————————–&
फोटो वडूज ता. खटाव येथील श्री भैरवनाथ देवस्थान काळभैरव यात्रा (छाया – अजित जगताप)