क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भुईंज:-पुणे – सातारा हायवे रोडवर खंबाटकी घाटात हायवे रोडलगत असणाऱ्या पेटोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या ४ गन्हेगारांना अटक.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

भुईंज:-पुणे – सातारा हायवे रोडवर खंबाटकी घाटात हायवे रोडलगत असणाऱ्या पेटोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या ४ गन्हेगारांना अटक.

पत्रकार प्रतिनिधी वैष्णवी शिंदे
दि. २२/०६/२०२६ रोजी रात्री भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.ताटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत
माहिती मिळाली की,मौज़े वेळे ता.वाई गावचे हद्दित करुणा मंदिरचे समोरील बाजुस,पुणे ते सातारा हायवे रोडचे पुर्व बाजुला झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांची इरटिगा कार हायवे रोडचे बाजुला लावून बसले असुन ते हायवे रोडलगत असणारे पेट्रोलापंपवरील कामगारांना लुटणार आहेत,अशी माहिती मिळाल्याने सपोनि श्री.ताटे यांनी तात्काळ श्री.तुषार दोषी,भापोसे, पोलीस अघीक्षक सातारा ,श्रीम.वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा,श्री.सुनिल साळूंखे, उपविभागीय पोलीस आधिकारी, वाई विभाग यांना माहिती दिली.त्यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे स.पो.नि श्री.पृथ्वीराज ताटे तसेच स.फौै शिंदे, पोे.कॉ.सपकाळ, पो.हवा
कदम व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी साध्या वेशात मिळाले माहितीचे ठिकाणी जावून खात्री केली.

त्यानंतर सोबतच्या पथकासह सापळा लावुन रात्री ०३.१५ वाजणेचे सुमारास अंधारात बसलेल्या दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांचे सोबत असलेला पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता ते पुणे जिल्हयातील खेडशिवापूर येथून येवुन हायवे रोडलगत असलेले पेट्रोलपंपावरील कामगारांचे पैसे लुटण्याची तयारी करणेसाठी तेथे थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंग झडतीमध्ये दोन कोयते, एक कटावणी, मिरची पुड,३ मोबाइल तसेच इरटिगा कार असे एकूण १० लाख ५२ हजार रुपयाचे किंमतीचे साहित्य मिळुन आले आहे.
आरोपींची नावे
१) आमित बजरंग चव्हाण वय २८ वर्ष मळ रा. कडाळ ता.जावली जि.सातारा सघ्या रा.इंदिरानगर,
खेडशिवापूर, ता.हवेली निःपुणे
२) साफियान मुस्ताफ मुजाहिद वय ३० वर्ष रा.खेडशिवापूर ता.हवेली जि.पुणे
३) सुरज महादेव जाघव वय १९ वर्ष रा.शिवाजीनगर, खेडशिवापुर ,ता.हवेली जि॰पुणे
४) विधीसंघर्षीत बालक
याबाबत भुईज पोलीस ठाणे गु.र.नं.४२/२०२६ भारतीय न्याय संहिता २००३ चे कलम ३१०(४)शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन पाहीजे असलेल्या पाचब्या आरोपीचा शोध सुरु आहे.सदर आरोपीकडून मेढा भागातील डीपी चोरी गुन्हा उघडकीस आला असून आणखीन डीःपी चोरी, घरफोडी, डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मा.श्री.तुषार दोषी,भापोसे पोलीस अधिक्षक सातारा,श्रीम.वैशाली कडूकर,अपर पोलीस अधीक्षक सातारा,श्री.सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी,वाई, यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे स.पो.नि.श्री.ताटे,पो.उप.निपतंग पाटील, पोःउपनि सरज शिंदे. सहा.पो.उप.नि दत्तात्रय शिंदे व पोलीस अंमलदार सुशांत धमाळ नितीन जाधव सोमनाथ बल्लाळ सागर मोहिते किरण निंबाळकर अजय सपकाळ अभिजीत वाघमळे यांनी गन्हा उघडकीस
आणला आहे. कामगिरी बाबत मा.पोलीस अधीक्षक सातारा मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा.उपविभागीय पोलीस आधिकारी, वाई यांनी भुईंज पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.




