आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-धोममध्ये २८ फेब्रुवारीला ‘शासकीय योजनांचा महाकुंभ’; न्यायमूर्तींच्या हस्ते भव्य उद्घाटन!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) वाई:-धोममध्ये २८ फेब्रुवारीला ‘शासकीय योजनांचा महाकुंभ’; न्यायमूर्तींच्या हस्ते भव्य उद्घाटन!

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि. २५ : वाई तालुक्यातील नागरिकांसाठी २८ फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज आता भासणार नाही! कारण धोम येथील नरसिंह हायस्कूलमध्ये ‘विधी सेवा व शासकीय योजना महाशिबिर’ भरत असून, एकाच छताखाली सर्व दाखले, अर्ज प्रक्रिया आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
या भव्य उपक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती यांच्या शुभहस्ते होणार असून, जिल्ह्यातील वरिष्ठ न्यायाधीशांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
काय मिळणार महाशिबिरात?
या शिबिरात केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांवर भर दिला जाणार आहे.
तज्ज्ञ वकिलांकडून मोफत कायदेशीर मार्गदर्शन
महिला, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विविध राज्य व केंद्र शासन योजनांची माहिती
आधार नोंदणी व अपडेट सुविधा
आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सोय
विविध योजनांसाठी जागेवरच अर्ज व कागदपत्र पूर्तता
मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी, औषधोपचार शिबिर
नियोजनाचा घेतला आढावा
मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एन. एन. बेदरकर, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए. जी. देशमुख व श्री. ए. ए. पाचरणे तसेच दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. आर. एम. भेंडे व श्री. व्ही. बी. शेट्टी यांनी नरसिंह हायस्कूलला भेट देत पार्किंग, आसनव्यवस्था व स्टॉल्स मांडणीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्याध्यापक देसाई सर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
“शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. वाई तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन श्री. अरविंद शं. वाघमारे (अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा) यांनी केले आहे.
वाई तालुक्यासाठी हा ‘महाकुंभ’ म्हणजेच लोकहिताचा नवा अध्याय ठरणार आहे.

2) कराड तालुक्यात महिलांच्या आरोग्यासाठी ‘याग सेवा संस्था’ची रणशिंग फुंकली; गावागावांत आरोग्य क्रांतीची सुरुवात!

कराड दि. २५ : ग्रामीण महिलांनी संकोचाच्या बेड्या तोडून आपल्या आरोग्याबाबत सजग व्हावे, या ठाम भूमिकेतून याग सेवा संस्था यांनी कराड तालुक्यात आरोग्य जनजागृतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. गावागावांत विशेष शिबिरांची मालिका राबवून महिलांच्या आरोग्याबाबत ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
ग्रामीण भागात महिलांवर घरगुती जबाबदाऱ्यांचे ओझे असल्याने त्या स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. विशेषतः वैयक्तिक आणि संवेदनशील आजारांबाबत बोलताना संकोच जाणवतो. हा अडसर दूर करण्यासाठीच केवळ महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात ही शिबिरे आयोजित केली जात आहेत.
या शिबिरांमध्ये महिलांच्या संवेदनशील आजारांची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, आजार होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, तसेच तज्ज्ञांशी थेट संवादाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असून, वेळेवर उपचार घेण्याबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे.
कराड तालुक्यातील महिला मंडळे आणि बचत गटांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या गावात शिबिर आयोजित करण्यासाठी सुभाष यादव (अध्यक्ष – याग सेवा संस्था, येरवळे, ता. कराड, मो. ९७०२७५८१९०) यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी उचललेले हे पाऊल कराड तालुक्यात आरोग्य क्रांतीची नांदी ठरत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button