कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-दक्षिण काशी वाई येथे ‘क्षण रेंटल्स’ दालनाचा शुभारंभ.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-दक्षिण काशी वाई येथे ‘क्षण रेंटल्स’ दालनाचा शुभारंभ.

वाई दि. १२ फेब्रुवारी २०२६ : दक्षिण काशी वाई येथे ‘क्षण रेंटल्स’ या दालनाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वाई शहरातील सौ. विनीता सुर्वे आणि सौ. पूजा महामुनी यांनी रेंटल्स दालनाची गरज ओळखून ‘क्षण रेंटल्स’ या नावाने नवीन दालनाचा शुभारंभ केला.
नगराध्यक्ष मा. अनिल सावंत यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच रील स्टार रमा लांजेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
आजच्या धावपळीच्या युगामध्ये विवाह, वाढदिवस, साखरपुडा समारंभ, शाळा-कॉलेजमधील कार्यक्रम, नाट्यनियोजन तसेच विविध कार्यक्रमांसाठी महागडे कपडे व दागिने खरेदी करणे सर्वांनाच शक्य नसते. अनेकदा कपडे एकदाच वापरले जात असल्यामुळे कमी खर्चामध्ये सर्व प्रकारचे समारंभ साजरे करता यावेत या उद्देशाने ‘क्षण रेंटल्स’ सुरू करण्यात आले आहे.
या दालनामध्ये लग्नसमारंभासाठी वधू-वरांचे पेहराव, तसेच विविध प्रकारचे साडी-ड्रेस साहित्य भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात साहित्य उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दालनाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. रील स्टार रमा लांजेकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी विविध मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी तसेच सुर्वे, तुपे,महामुनी वनारसे परिवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button