श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळ्याचे चोराडे तुन पंढरपुरला प्रस्थान…! चोराडेसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती…
प्रतिनिधी :- खटाव :-अनमोल गुरव 9881355582

श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळ्याचे चोराडे तुन पंढरपुरला प्रस्थान…!
चोराडेसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती…
अनमोल गुरव 9881355582 प्रतिनिधी चोराडे : खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळ्याचे चोराडेतुन पंढरपुरला प्रस्थान झाले असुन या दिंडी सोहळ्यात चोराडे, ढाणेवाडी,निमसोड, येडे,उपाळे(मायणी), पवारवाडी,म्हासुर्णे,बेलवडे,दा पोली या गावातुन दोनशे ते अडिचशेच्या आस पास वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
तरी या दिंडी सोहळयातील रथामध्ये श्री.संत बयाजी महाराजांची पालखी ठेवण्यात आली असुन रथाबरोबर वारकरी चालताना अभंग, हरिपाठ, भजन करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करित पालखी सोहळा पंढरपुराकडे चालला आहे.या पालखी सोहळयात महिलावर्ग मोठया प्रमाणात सहभागी झाले आहेत.
तरी दिंडी चालक ह.भ.प.प्रकाश लोकरे महाराज यांच्या अधिपत्याखाली हा दिंडी सोहळा गेल्या १० वर्षापासुन अविरथपणे सुरु आहे. तरी पांडुरंगाच्या आर्शिवादाने श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला असुन या दिंडी सोहळयास चोराडे व परिसरातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.