खटाव :-मायणी -पेट्रोल डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मायणी पेट्रोल डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट मायनी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील मायणी निम शहरात सध्या पेट्रोल डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांनी गस्त वाढवावी व चोरट्यांचा छडालावावा अशी मागणी वाढू लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मल्हार पेठ पंढरपूर रस्ता रुंदीकरण डांबरीकरण झाल्याने अनेक वाणी रस्त्याच्या कडेला उभी असतात ही संधी साधून चोरटे पेट्रोल काढून घेतात. तर मोठ्या गाडीचे मोठ्या गाड्यांचे टाकीचे झाकन सीताफिने काढून त्या टाकीत पाईप टाकून संपूर्ण टाकी खाली करतात सध्या पेट्रोलचे दर 100 च्या वर आहेत. तर डिझेलचा दर शंभरच्या जवळपास आहे. शंभर रुपये डिझेल ची किंमत दहा हजार रुपये होते त्यामुळे मोठ्या वाहनधारकांना फार मोठा आर्थिक फटका बसतो परवाच येथील विजय रामचंद्र देशमुखे यांच्या ट्रक मधील 80 लिटर डिझेल चोरट्यांनी पाईप टाकून काढून घेतले एक तर मोठ्या वाहनांना धंदा नाही आणि दुसरीकडे डिझेल चोरी या दुहेरी संकटात मोठे वाहनधारक अडकलेले आहेत. तरी मायणी पोलिसांनी दक्ष राहून गस्त वाढवावी व इंधन चोरट्यांना पोलीस खाक्या दाखवावा अशी मागणी वाहनधारकातून मोठ्या प्रमाणात होत आहे.