वाई:-(आसरे)-“पाण्याची क्रांती आसरेत!” १३ लाखांचा ‘ॲक्वा पुरिफायर’ सुरू; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भक्कम पाऊल.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“पाण्याची क्रांती आसरेत!” १३ लाखांचा ‘ॲक्वा पुरिफायर’ सुरू; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भक्कम पाऊल.

वाई, दि. १४ : विद्यार्थ्यांना शुद्ध, जंतूमुक्त पाणी मिळावे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या सामाजिक जाणिवेतून आसरे (ता. वाई) येथील कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात १३ लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे (ॲक्वा पुरिफायर) दमदार लोकार्पण करण्यात आले. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
डेट वायलर फार्मा पॅकेजिंग इंडिया लि. (केसुर्डी) आणि प्लॅनेट वॉटर फाउंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारण्यात आला. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य नंदकुमार कोकरे सर यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्प प्रत्यक्षात आणला.
प्लॅनेट वॉटर फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक चैतन्य कुसुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर नंदकुमार कोकरे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, जलजन्य आजारांवर मोठा आळा बसण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्याला उद्योजक संतोष अंबवले, समाजसेवक आत्माराम सणस, संजय जेधे देशमुख, बाबूराव चोरट, दिनकर सणस, नारायण सणस, शिवाजीराव धनावडे, विशाल सणस, अंकुश चोरट यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली. समीर सय्यद यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले, तर संतोष डगळे यांनी आभार मानले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हा सोहळा यशस्वी ठरला.
आसरे विद्यालयातील हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या निरोगी भविष्यासाठी उचललेले ठोस आणि प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.




