आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोनाके:-(कोरेगाव)-हस्तलिखित स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनके ता.कोरेगाव शाळेचे नेत्रदीपक यश.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हस्तलिखित स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनके ता.कोरेगाव शाळेचे नेत्रदीपक यश.

सातारा:-
जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण व्यक्तिमहत्व विकास स्पर्धा अंतर्गत जिल्हा स्तरावरील हस्तलिखित स्पर्धेत मोठ्या गटात जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनके ता.कोरेगांव या शाळेने सादर केलेल्या “कला कौस्तुभ” या हस्तलिखिताला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनके हि स्व.यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा व स्व. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमहत्व विकास स्पर्धा यांमध्ये दर वर्षी उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करत उज्वल यश मिळवण्याची परंपरा अखंड चालू आहे.या वर्षी जिल्हा स्तरीय हस्तलिखित स्पर्धेत सानवी भोसले,स्नेहल जगताप, जान्हवी भोईटे ,कल्याणी धुमाळ, तृप्ती साठे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .या सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुकाराम पवार, मार्गदर्शक शिक्षक राजाराम घोरपडे, विश्वनाथ गायकवाड, शिवाजी जगताप,विद्या लेंभे,शितल निकम,किर्ती जाधव यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक स्वयम् सेवक प्रणाली धुमाळ व पल्लवी जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले या नेत्रदीपक यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी , कोरेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सौ वनिता मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ कुरपड, केंद्रप्रमुख अनिलकुमार खुडे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सर्व सदस्य, ग्रामस्थ ,शिक्षक यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशील कलेला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची सुंदर जोड लाभली आणि स्वप्न साकार झाले असे भावपूर्ण उद्गार जिल्हा परिषद केंद्र शाळा सोनके मधील उपक्रमशील व प्रयोगशील गुणवंत शिक्षिका सौ विद्या लेंभे – पवार यांनी काढले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button