मुंबई:-“आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची नवी जबाबदारी!” मा.मंगेश चिवटेंवर.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची नवी जबाबदारी!”

मुंबई : उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, आरोग्यदूत व रुग्णसेवक गुरुवर्य मा.मंगेश चिवटे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अग्रगण्य व प्रतिष्ठित संस्थेच्या Pharma, Health Care & Wellness Committee च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी मानली जात आहे. मा. चिवटे सर यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर, पारदर्शक व प्रभावी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
MACCIA सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून आता फार्मा, हेल्थ केअर व वेलनेस क्षेत्रात व्यापक धोरणात्मक मार्गदर्शन, उद्योग-आरोग्य समन्वय आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वातून आरोग्य क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित होतील व सर्वसामान्यांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि पारदर्शक आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मा. मंगेश चिवटे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
शुभेच्छुक:

सुरेश शिंदे
मुंबई महानगर प्रमुख, वैद्यकीय मदत कक्ष

महेंद्र सुधाकर शेडगे कांदवली-चारकोप, मालाड विधानसभा विभाग प्रमुख, वैद्यकीय मदत कक्ष




