मुंबई:-कोर्टात थरारक क्षण; ‘सीपीआर’मुळे सीनियर सिटीजनला नवजीवन! बेस्टचे SPL-INS 41 अजित जाधव आणि SPL-INS 16 विक्रम चव्हाण ठरले खरे हिरो.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कोर्टात थरारक क्षण; ‘सीपीआर’मुळे सीनियर सिटीजनला नवजीवन! बेस्टचे SPL-INS 41 अजित जाधव आणि SPL-INS 16 विक्रम चव्हाण ठरले खरे हिरो.

मुंबई | दि. 07 फेब्रुवारी 2026
MACT कोर्ट क्र. 7 येथे MACP No. 122/24 या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एक थरारक प्रसंग घडला आणि काही क्षणांत संपूर्ण न्यायालयात चिंतेचे वातावरण पसरले.
सदर प्रकरणातील फिर्यादी, वय अंदाजे 66 वर्षे, यांची बाजू अॅड. राजेश पवार मांडत होते. क्रॉस-एक्झामिनेशनदरम्यान बेस्टच्या वतीने अॅड. विमल खंदारे यांनी नेहमीप्रमाणे कडक प्रश्न उपस्थित केले. त्यावर भावनिक होत फिर्यादीने जोरात प्रतिवाद केला – “खुदा कसम, मैं सच बोलता हूं, मेरी कोई गलती नहीं… तुम्हारे ड्रायव्हर की गलती है!”
क्रॉस संपल्यानंतर मा. न्यायाधीश अश्रफ घानिवाले साहेब यांनी फिर्यादीस डायसवरून खाली उतरायला सांगितले. मात्र खाली उतरत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते कोसळणार इतक्यात न्यायालयात उपस्थित असलेले बेस्टचे स्पेशल इन्स्पेक्टर क्रमांक 41 अजित जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना झेलले.
न्यायाधीशांनी तत्काळ पाणी देण्यास सांगितले. परंतु फिर्यादी प्रतिसाद देत नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अजित जाधव यांनी त्यांच्या नाकाजवळ हात नेऊन श्वास तपासला — श्वास बंद! छातीची धडधड थांबलेली!
क्षणाचाही विलंब न करता अजित जाधव आणि त्यांचे सहकारी SPL-INS 16 विक्रम चव्हाण यांनी तातडीने CPR सुरू केले. जवळपास नऊ वेळा छातीवर दाब देत प्रयत्न सुरू ठेवले… आणि दहाव्या प्रयत्नात अचानक त्या व्यक्तीने मोठ्याने श्वास घेतला व डोळे उघडले!
न्यायालयात उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता; मात्र वेळेवर दिलेल्या CPRमुळे त्यांचे प्राण वाचले.
ही संपूर्ण घटना चेअरमन मॅडम मो.ई. आरर्लंड, रजिस्ट्रार श्री. अशोक पोटावे, मा. न्यायाधीश अश्रफ घानिवाले साहेब, अॅड. विमल खंदारे आणि न्यायालयातील सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत घडली.
घटनेनंतर दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी चेअरमन मॅडम यांनी MACT कोर्ट, मुंबई बार कौन्सिल येथे अजित जाधव आणि विक्रम चव्हाण यांचा विशेष सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
⭐ कर्तव्यदक्षतेचा आदर्श
अपघात आणि दावे विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, प्रसंगावधान आणि मानवतावादी भावना यामुळे एका कुटुंबाचा आधार वाचला आहे.
त्यांच्या या धाडसी कृतीमुळे बेस्ट उपक्रमाची प्रतिमा जनमानसात निश्चितच उंचावली आहे.
वाहतूक विभाग, अपघात व दावे विभाग, मुंबई सेंट्रल आगार तर्फे दोन्ही अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.




