श्रीरामपूर:-लिंगपिसाट शिक्षक सच्या गोणारकरला विजयाताई बारसेंनी श्रीरामपुर कोर्टात कानफडवला …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) लिंगपिसाट शिक्षक सच्या गोणारकरला विजयाताई बारसेंनी श्रीरामपुर कोर्टात कानफडवला …..

श्रीरामपुर / माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेत दुसरीच्या o४ विद्यार्थ्यांनी वर अत्याचार करणारा व पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी सचिन /सच्चा महाजन गोणारकर याला आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी रिमांड कामी कोर्टात आणले होते.
दुपारच्या सुमारात या आरोपीला कोर्टात पाहून सेतावलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा आवाज जनतेचा यूट्युब न्युज चैनलच्या संपादिका विजयाताई बारसे यांनी सहकाऱ्यांसह आरोपीच्या कानफडात लगावत चो प देण्याचा प्रयत्न केला .तेव्हा ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखत लिंगपिसाट आरोपीला थेट कोर्ट रूममध्ये नेले.
दरम्यान या घटनेमुळे कोर्टात काही काळ गोंधळ निर्माण होवून तणावपुर्ण वातावरण झाले होते परंतु विजयाताई बारसे यांनी धारण केलेल्या रुद्रावताराचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
2) बालसुरक्षेच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; गौतम चित्ते यांचा इशारा.

श्रीरामपूर : शहरातील दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या ८ वर्षांच्या चार विद्यार्थिनींशी एका शिक्षकाने अयोग्य वर्तन केल्याची बाब समोर आल्यानंतर पालक वर्गात भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.शाळेतील गैरप्रकाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम चित्ते यांची आक्रमक भूमिका घेतली असून वंचित बहुजन आघाडी पीडितांच्या पाठीशी ठाम उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सचिन महाजन गोणारकर (वय ३५, मूळ रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड; सध्या रा. वार्ड क्र. ०७, श्रीरामपूर) यांची नियुक्ती १ ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र पोर्टलमार्फत संबंधित शाळेत झाली होती. विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली. प्रकरण बाहेर जाऊ नये, अशी भूमिका संस्थेकडून घेतली गेल्याचा आरोप पालकांनी केला असून, त्यामुळे त्यांच्यात अधिक नाराजी पसरली.
यानंतर संतप्त पालकांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत आरोपी शिक्षकाविरुद्ध पोस्को (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम चित्ते, जिल्हा युवा महासचिव सुनील वाघमारे तसेच इतर पदाधिकारी यांनी शाळेत जाऊन प्रशासनाशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली.
“पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळाला पाहिजे. आरोपी कोणत्याही समाजाचा असो, वंचित बहुजन आघाडी पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असे स्पष्ट वक्तव्य तालुका अध्यक्ष गौतम चित्ते यांनी केले.
या घटनेनंतर शाळांमधील बालसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.




