सज्जनगड:-दासनवमी उत्सवानिमित्त सज्जनगडावर भाविकांचा मेळा..
जेष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) दासनवमी उत्सवानिमित्त सज्जनगडावर भाविकांचा मेळा..

सज्जनगड दि: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्या नजीकच्या परळी खोऱ्यातील सज्जनगडावर दासनवमी उत्सवानिमित्त भाविकांचा मेळा भरलेला आहे. महाराष्ट्र व प्रांतातून आलेल्या भाविकांच्या सुखसुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळ कार्यरत झाले आहेत.
समर्थ स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी सज्जनगडावर गर्दी केली आहे. भाविकांना सुलभ रीत्या दर्शन होत आहे. विविध साहित्याची दुकान सजली आहेत. मोठ्या प्रमाणात दासबोध व मनाचे श्लोक पुस्तिका, जपमाळा व इतर साहित्य खरेदी केली जात आहे.
बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दास नवमी उत्सवातील मुख्य दिवस असल्यामुळे सज्जनगडावर भाविकांनी गर्दी केली आहे. आबालवृद्ध अनेक जण शांततेने दर्शन घेत आहेत. तसेच दुपारी महाप्रसादाचे लाभ होत आहे. पहाटे दोन वाजता काकड आरती, चार वाजता श्री समर्थांच्या समाधीची महापूजा आणि सायंकाळी साडेसहा वाजता सांप्रदायिक भिक्षावळीचा कार्यक्रम होत आहे.
रात्री साडेदहा वाजता आरती आणि तेरा मंदिर मधील प्रदक्षिणा व छबिना व दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता समर्थ निर्वाण कथा रात्री साडेनऊ वाजता कीर्तन असे कार्यक्रम आहेत.
गेली दहा दिवसापासून उत्सव भरला आहे. भाविकांच्या शिस्तप्रिय व समर्थ रामदास स्वामी व मनाचे श्लोक पठण, शास्त्रीय गायन सेवा यामुळे या उत्सवाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. दोन संस्था परंतु, भाविकांच्या सुखसुविधीसाठी एका दिल्याने प्रयत्न होत आहेत. याची भाविक कौतुक करत आहे.
या ३४४ व्या दास नवमी साठी जय जय रघुवीर समर्थ… जय श्रीराम.. जयघोष सुरू झालेला आहे. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळ अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, सौ .रसिका ताई ताम्हणकर , अभ्यंकर बुवा रामदासी, योगेश बुवा रामदासी, डॉ. अच्युत गोडबोले आदी मान्यवर व सेवेकरी सेवेचा लाभ देत आहेत.
2) श्री कुसुंबी यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री.देवी दर्शनाचा घेतला लाभ…

सातारा दि: जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री. काळेश्वरी तथा काळुबाई देवी कुसुंबी येथील वार्षिक यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री. देवीची पूजा अर्चा करून दर्शन घेतले. यावेळी उत्तमरीत्या भाविकांची व्यवस्था झाल्याने खऱ्या अर्थाने भाविकांनीही श्री काळेश्वर देवी यात्रा कमिटी व ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेचे आभार मानले.
दरवर्षी श्री. काळेश्वरी तथा श्री काळुबाई देवीची यात्रा ही नियमाप्रमाणे संकष्टी चतुर्थीला भरते. परंतु, यंदाच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी यात्रा दिनांक ९ ते १० फेब्रुवारी रोजी घेण्याचा सामुदायिक निर्णय घेण्यात आला. त्याला भाविकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
वी या यात्रेनिमित्त श्री काळेश्वर देवीची सासनकाठी श्री.च्या गाभाऱ्यातील राऊळ मध्ये नेवैद्य व श्रीफळ वाढवण्यात आले. भैरोबाची पालखी व काळुबाई बहिणींची पालखी तसेच गांजे, मालचोंडी येथील कुसुंबीतील श्री काळेश्वरी देवीची व श्री भैरवनाथ गाठीभेटी, छबिना आणि महत्वाचे म्हणजे कुसुंबीच्या शिवतेज ग्रुपच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वार्षिक यात्रेनिमित्त महावितरण सेवा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसेस व अग्निशमन दल व पोलिस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांनी घेतलेले परिश्रम घेतले .
श्री काळेश्वर देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पनवेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बार्शी, धाराशिव, कर्नाटक राज्यातूनही भाविक आले होते. विशेषतः महिला भाविक वर्गाची गर्दी लक्षणीय होती. यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवी साडी- चोळी तसेच धार्मिक साहित्याची खरेदी जोमात झाली.
श्री क्षेत्र कुसुंबी या ठिकाणी मंदिर परिसरात भाविकांनी श्रीफळ वाढवू नये. अशी सक्त सूचना करूनही श्रीफळ वाढवण्यासाठी गर्दी झाली होती. तरीही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विशेषता सरपंच मारुती चिकणे, पोलीस पाटील एकनाथ सुतार, ट्रस्टचे किसनराव चिकणे, विजय वेंदे ,संतोष चिकणे, सूर्यकांत चिकणे, देवेंद्र सुतार, शंकर बेंद्रे, श्रीकांत चिकणे, उपसरपंच निवृत्ती मोरे व सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे, माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री चे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख समृद्धीची ही प्रार्थना केली. काहींचे नवस पूर्ण झाल्याबद्दल भक्ती भावाने त्यांनी पूजाअर्चा केली व नेवैध दाखवला. देणगी दिली.
व यावेळी पुरणपोळीच्या नेवैध दाखवून भाविकांनी ही आस्वाद घेतला. अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने उत्तम सुविधा केल्याबद्दल भाविकांनीही आभार मानले. तसेच मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तरुणाईने सेल्फी काढण्यासाठी मनमुराद आनंद घेतला. एक चांगले दर्जेदार पर्यटन स्थळ आकार घेत असल्याने खऱ्या अर्थाने श्री. काळेश्वरी देवी सर्वांना पावली आहे.
3) कातर खटाव:-माणुसकीच्या धनाने कातर खटाव मध्ये संस्काराला मिळाले अभय..

कातर खटाव दि: सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी झाली. परंतु ,सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या कातरखटाव जि प मतदार संघात भाजप विजयी उमेदवार धनंजय चव्हाण व राष्ट्रवादी पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांची भेट झाली. माणुसकीच्या धनाने संस्काराचेही अभय असल्याचे दिसून आले.
खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कातर खटाव गटाच्या निवडणुकीमध्ये पंधरा दिवस अत्यंत संयमी व लोकशाहीला साजेस अशा पद्धतीने कर्तबगार उमेदवारांनी प्रचार केला. भविष्यात कातरखटाव जिल्हा परिषद गटासाठी कोणत्या योजना राबवणार? विकास काय करणार? याचीच परिपूर्ण माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. तसेच मतदारांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचाही पुरवठा केला.
काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये रंगत आणली असली तरी शांतता भंग होऊ नये. याची काळजी घेण्यासाठी उमेदवार तत्पर होते. त्यांनी अनेकदा उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला.
सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी वडूज या ठिकाणी मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय चव्हाण यांना १२,८३३ मते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभय जगताप यांना १२,०५९ मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजय सानप यांना २९१ मते मिळाली.
भाजपचे उमेदवार धनंजय चव्हाण यांचा विजय झाल्यानंतर सर्वच कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक व फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली. या गर्दीतही मोठ्या मनाने राष्ट्रवादी पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी भाजपचे विजयी उमेदवार धनंजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकली. आणि राजकीय हेवेदाव्याचाच पराभव झाला. असा निकाल हाती आला. त्याचे जोरदार खटाव तालुक्यात स्वागत केले जात आहे.
लोकशाहीमध्ये जय- पराजय यापेक्षाही तुम्ही कशा पद्धतीने माणुसकी व संस्कार दाखवता यावर बरेच काही अवलंबून आहे. या दोन्ही नेत्यांची आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे. दोन्ही नेत्यांना सुज्ञ मतदारांनी आपले बहुमूल्य मत दिल्याबद्दल मतदारांनी सुद्धा मनापासून समाधान व्यक्त केले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. संघर्ष हा विकास कामासाठी असावा परंतु व्यक्तिगत हिरवे दावे साठी नसावा हे या गोष्टीने सिद्ध झाले आहे.




