वाई:-‘अतिक्रमणाच्या जाळ्यात वाई बंदिस्त’; वाहतूक कोलमडली — पालिका-पोलीसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संतापाचा स्फोट! ‘कारवाईचा फक्त दिखावा… शहराचा स्वास गुदमरला’; अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त कधी?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘अतिक्रमणाच्या जाळ्यात वाई बंदिस्त’; वाहतूक कोलमडली — पालिका-पोलीसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संतापाचा स्फोट!
‘कारवाईचा फक्त दिखावा… शहराचा स्वास गुदमरला’; अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त कधी?

वाई | प्रतिनिधी
वाई शहरातील अतिक्रमण, अनियंत्रित पार्किंग आणि ढासळलेली वाहतूक व्यवस्था यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून शहराचा स्वास गुदमरल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिका व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्यांवरील खड्डे, दोन्ही बाजूंनी उभी असलेली चार-चाकी व दुचाकी वाहने आणि फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पूर्वी चौकात कारवाई करणारे पोलीस आता केवळ नावापुरतेच दिसत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी शहरात कुठेही पार्किंग करण्याची बेफिकीर पद्धत वाढली असून वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
पोलीस दलातील तुटवडा, अल्पवयीनांकडून बेधडक वाहनचालना आणि चौकातील सुरक्षा रक्षकांची निष्क्रियता यामुळे वाहतुकीची शिस्तच कोलमडली आहे. किसनवीर चौक, आमंत्रण चौक, महागणपती मंदिर परिसर, चित्रा टॉकीज मुख्य रस्ता, बावधन नाका ते विराट नगर या भागांत अतिक्रमण व पार्किंगमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गणपती घाट, नवीन पूल तसेच शहरातील प्रमुख गल्ल्यांमध्ये पार्किंगचा कहर वाढला असून ट्रॅफिक जाम ही नित्याचीच समस्या झाली आहे. फळविक्रेते, दुकानदार व जाहिरात फलकांनी फुटपाथ व्यापल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मालवाहतूक वाहने कधीही रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो.
बांधकाम क्षेत्रातही अतिक्रमणाचे प्रमाण वाढले असून पार्किंग न सोडताच इमारती उभ्या राहत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या आढावा बैठका केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
एकंदरीत वाई शहरातील अतिक्रमण आणि वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी वाईकर नागरिकांकडून होत आहे.
🔲 चौकट : एसटी बसस्थानकासमोरील रस्ता रुंद — पण पार्किंगमुळे ठप्प!
एसटी बसस्थानकासमोर चौपदरीकरण करून रस्ता रुंद करण्यात आला; मात्र दुकानदार व पर्यटकांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे तो कुचकामी ठरला आहे. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व कडक अंमलबजावणीची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




