सायगाव:-जावळीत मतदारांच्या कृपादृष्टीने तिन्ही पक्ष खुश … आणि नाराजही
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जावळीत मतदारांच्या कृपादृष्टीने तिन्ही पक्ष खुश … आणि नाराजही

सायगाव दि: छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीतील मतदारांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांना नाराज केले नाही. उलट तीन जिल्हा परिषद सदस्य गट आणि जावळी पंचायत समितीच्या सहा जागेमध्ये मतदारांच्या कृपादृष्टीने तिन्ही पक्षाला खुश ठेवले आणि नाराजही झाले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या निष्ठावंत व प्रचारात आघाडी घेतलेल्या कार्यकर्त्याच्या अंगावर गुलालाची उधळण तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली आहे. ज्यांचा पराभव झाला. त्यांच्याही लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. या निवडणुकीत आता नेत्यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
जावळी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे व त्यांच्या समर्थकांनी गेली पंधरा दिवस प्रचाराची राळ उठवली होती. आता निकाल बाहेर पडल्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये कभी खुशी कभी गम वातावरण निर्माण झाले आहे.
नवसाला पावणाऱ्या श्री काळुबाईं देवीच्या कुसुंबी जिल्हा परिषद गटात
शिवसेनेच्या सौ कविता एकनाथ ओंबळे या १८० मताधिक्य घेऊन विजयी
झाल्या. सौ. कविताएकनाथ ओंबळे (शिवसेना) ८९५१, सौ.अर्चना ज्ञानदेव रांजणे (भाजपा) ८७७१,सौ.कल्पना गणपत पार्टी (अपक्ष) १२८ नोटा१०५. कुसुंबी गणात भाजपाच्या सौ. पुष्पा चिकणे यांचा सौ. सुनीता दुंदळे यांनी ४८२ मतांनी पराभव केला. पुष्पा जगन्नाथ चिकणे (भाजपा) ३३६७, सुनिता विलास दुंदळे शिवसेना ४२४९ अशी मते मिळाली.
आंबेघर तर्फ मेढा गणात अतिश कदम यांनी
भाजपच्या विजय सपकाळ यांचा ७२२
मतांनी पराभव केला. अतिश संतोष कदम
शिवसेना ५१७५ विजय बाबाजी सपकाळ
भाजपा ४४५३ अशी मते मिळाली.
राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कुडाळ पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाचे
उमेदवार प्रतापगड सहकारी साखर
कारखान्याच्या चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे
यांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र शिंदे
यांचा २०७७ मतांनी दारुण पराभव केला.
सौरभ राजेंद्र शिंदे भाजप ५२०९, राजेंद्र
रामचंद्र शिंदे (राष्ट्रवादी) ३१३२, प्रशांत मारुती
तरडे (शिवसेना) ६०९, राजेंद्र खाशाबा शेवते
(अपक्ष) १९३, तर नोटा ला १३८ मते मिळाली.
सायगाव गणामध्ये भारतीय जनता
पक्षाच्या उमेदवार चारुशीला विवेक पवार
यांनी राष्ट्रवादी
उमेदवार साक्षी विजय देशमुख यांचा २०८५
मतांनी पराभव केला. या निवडणुकीत साक्षी विजय देशमुख
(राष्ट्रवादी) ४२४२, चारुशीला विवेक पवार
(भाजपा) ६१२७ तर नोटाला ३२७ मते
मिळाली
जावळी तालुक्यामध्ये कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये एकतर्फी निवडणूक होणार असल्याचे मानण्यात येत होते. हे खरे करून मतदारांनी दाखवले आहे या ठिकाणी भाजप उमेदवार व जावळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ जयश्री मणिलाल गिरी यांनी तब्बल ६७१६ एवढ्या विक्रमी मतांनी
विजय संपादन केला. जिल्हा परिषदेचे
अध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असून या
पदावर सौ गिरी यांचाच दावा अधिक
भक्कम केला आहे. अध्यक्ष पद किंवा महिला बालकल्याण समिती सभापती पद त्यांना निश्चितच मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत जयश्री
गिरी यांना ११९१७ मते मिळाली राष्ट्रवादी
शरद पवार गटाच्या उमेदवार सौ.पूनम प्रशांत
नायकुडे यांना ५२०१ मते मिळाली तर अपक्ष
सौ. जयश्री संजय शेवते यांना २३६७ मते
मिळाली. ३०० मतदारांनी नकारात्मक
(नोटा ) मतदान केले.
इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या बहुचर्चित अशा या म्हसवे गटात दोन कुणबी मराठा दाखला घेतलेल्या उमेदवारांमध्येच चांगली लढत झाली. म्हसवे गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षआणि ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप पवार यांचा २२२७ मतांनी पराभव केला.
या निवडणुकीतवसंतराव ज्ञानदेव मानकुमरे (भाजपा) यांना९८९८ संदीप सर्जेराव पवार (शिवसेना) ७६७१,संतोष दिनकर शिराळे (अपक्ष) ३००, नोटा१६५ असे मतदान झाले.
खर्शी बारामुरे गणात भाजपच्या गोरख
महाडिक यांनी राष्ट्रवादी पक्षाचे
विठ्ठल गोळे यांचा ८६६ मतांनी पराभव
केला. विठ्ठल गुलाबराव गोळे (राष्ट्रवादी)
३५६३ गोरख सिताराम महाडिक
(भाजप)चा ४४२९, किरण हनुमंत गायकवाड
(अपक्ष) २१३, नोटा १२१. म्हसवे गणात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या
सौ. शिल्पा मिलिंद शिंदे यांनी भारतीय जनता
पक्षाच्या रेश्मा समाधान पोफळे यांना धक्का
देत १९७ मतांनी विजय मिळवला. सौ. रेश्मा
समाधान पोफळे यांना ४६५५ सौ. शिल्पा
मिलिंद शिंदे (राष्ट्रवादी) ४८५० संगीता
दिनकर भिसे (अपक्ष) ८३, नोटा ११९. मते मिळाली आहेत.
जावळी तालुक्यात सत्ताधारी भाजप पक्षाला रोखण्यामध्ये महायुतीतील शिवसेना यशस्वी ठरली आहे. राजकारणातील नवखा उमेदवार म्हणून शिवसेनेचे संदीप पवार यांनी म्हसवे गटात चांगलीच लढत दिली आहे. या निवडणुकीमध्ये जावळी तालुक्यातील जुने पत्रकार नारायण भोसले यांची कन्या व शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुनिता दुंदळे विजय झाल्या. तर भाजप उमेदवार पत्रकार विजय सपकाळ यांचा निसटता पराभव झाला. दोन्ही निकाल धक्कादायक असले तरी मतदारांच्या दृष्टीने तिन्ही पक्षाला खुश ठेवण्यामध्ये मतदार हे खुश ठेवले गेले. याच्या संकेत मिळाले आहेत. मेढा नगरीत जल्लोष व फटाक्याचे आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तिन्ही पक्षाच्या समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




