क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

कॅलिफोर्निया:-हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 कॅलिफोर्निया:-हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष!

मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान!

*कॅलिफोर्निया, सॅन होजे (प्रतिनिधी) :* महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला. त्या म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.” नाफाने दिलेल्या सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी अभिजित घोलप आणि नाफाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

‘नाफा’ म्हणजे केवळ चित्रपट महोत्सव नव्हे, सांस्कृतिक जागर!

अभिजित घोलप म्हणाले, “नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे. मराठी भाषा-संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या या प्रवासात युवा पिढीही हिरिरीने सहभागी होत आहे. यापूर्वीचा नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर व अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना देण्यात आला आहे. आज त्याच प्रभावळीतील रोहिणीताई हट्टंगडींचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या सहवासाने नाफाचे व्यासपीठ अधिक समृद्ध होत आहे.”

रेड कार्पेटवर मराठी सेलिब्रिटींचा ‘स्वॅग’

रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, प्रसाद ओक, अजिंक्य देव, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, नागराज मंजुळे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि निर्माती मंजिरी ओक व गार्गी कुलकर्णी यांच्या आकर्षक रेड कार्पेट एन्ट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कलाकारांच्या पेहरावात महाराष्ट्रीयन परंपरा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक ग्लोबल स्टाईलचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला. विशेष फोटोशूट आणि मीडिया लाऊंजमधील दिलखुलास संवादामुळे सोहळ्याची रंगत आणखी वाढली.

यानिमित्त प्रथेनुसार आदल्यादिवशी ‘नाफा’ संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या घरी ‘गाला डिनर’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘गाला डिनर’मध्ये मराठी कलावंतांसह अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. सॅन होजे येथील California Theatre मध्ये तीन दिवस रंगणाऱ्या ‘नाफा महोत्सवा’च्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व मनोरंजक कार्यक्रमांसह अनेक चित्रपट आणि लघुपटांचे वर्ल्ड प्रीमिअर व विशेष स्क्रीनिंग होणार आहेत. हॉलिवूडच्या पंढरीत मराठी सिनेमाचा झेंडा आणि मराठी संस्कृतीचा जागर घडविणारा ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६’चा हा दिमाखदार सोहळा जागतिक मराठी समुदायासाठी निश्चितच अभिमानाचा ठरत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

प्रसिद्धी व जनसंपर्क : राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी)
मो. / व्हॉट्सअॅप : 9821498658 / 8080822385

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button