कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी जिल्हा परिषद गटासाठी तब्बल १,०२४ घरकुले मंजूर!

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी जिल्हा परिषद गटासाठी तब्बल १,०२४ घरकुले मंजूर!

नामदार जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नांना यश; माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचेही विशेष योगदान.

मायणी | प्रतिनिधी
मायणी जिल्हा परिषद गटातील गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल १,०२४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण विकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही विक्रमी मंजुरी मिळाल्याची माहिती मायणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य अॅड. सुरेश पाटील यांनी दिली.
या मंजुरीमुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
गावनिहाय मंजूर घरकुलांची संख्या
मायणी जिल्हा परिषद गटातील विविध गावांना मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे—
मायणी — २३८
कलेढोण — १९६
विखळे — ११६
चितळी — ११५
अनफळे — ६०
गारुडी — ४६
पाचवड — ४२
गारळेवाडी — ४१
ढोकळवाडी — ३९
हिवरवाडी — ३८
कान कात्रे — ३३
कान्हेरवाडी — २६
मुळीकवाडी — १८
तरसवाडी — १६
अशा प्रकारे संपूर्ण मायणी जिल्हा परिषद गटासाठी एकूण १,०२४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
गरजू कुटुंबांच्या स्वप्नांना मिळणार बळ
घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळते. मायणी जिल्हा परिषद गटासाठी एवढ्या मोठ्या संख्येने घरकुले मंजूर झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घरकुले मंजूर होण्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनीही विशेष प्रयत्न केले, असल्याचे अॅड. सुरेश पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, मंत्री जयकुमार गोरे आणि डॉ. येळगावकरांचे आभार
मायणी जिल्हा परिषद गटासाठी विक्रमी संख्येने घरकुले मंजूर झाल्याबद्दल अॅड. सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री, ग्रामीण विकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे तसेच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचे विशेष आभार मानले.
या निर्णयामुळे मायणी जिल्हा परिषद गटातील अनेक कुटुंबांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात येणार असून, शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला आणि गरजू कुटुंबांच्या जीवनमानाला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button