वैभव गायकवाड:- सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना केंद्रीय गृहमंत्री पदक बहाल.
प्रतिनिधी :- रफिक शेख :- पुणे : :- 9021132121

वैभव गायकवाड – सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना केंद्रीय गृहमंत्री पदक बहाल
पुणे , दि. 3 (रफिक शेख) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या हस्ते श्री. वैभव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुणे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यात आले.
त्याचप्रमाणे जेष्ठ विधीतज्ञ पद्मश्री उज्वल निकम साहेब यांनी सुध्दा गायकवाडसाहेब यांना केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व खासदार मा. श्री. उदयनराजे भोसले यांच्यामार्फत सुध्दा API वैभव गायकवाड यांना पदक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. असून त्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्याचप्रमाणे त्यांच्या गावी खोडद येथे गावकर्यांनी त्यांना सन्मानित करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.