महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी कन्याने ग्रामीण जागरूकता कार्यक्रमांतर्गत गोरेगाव वांगी येथे विविध कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी:- सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची , ता- कराड ,जि – सातारा येथील कृषी कन्यांनी ग्रामीण जागृकता कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये तालुका खटाव येथील गोरेगाव वांगी येथे विविध उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी १ जुलै कृषी दिनानिमित्त गावामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. सातारा जिल्हा परिषद शाळा गोरेगाव वांगी येथील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून कार्यक्रमामध्ये उत्साहात सहभाग घेतला. तसेच वनविभागाचे मा. श्री समाधान बनसोडे व सौ. संजीवनी बनसोडे यांनी वृक्षारोपनासाठी २० वृक्षांची देणगी केली व कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमामध्ये कृषी कन्या साक्षी गावडे ,प्रिती देडे , पायल खोमणे , सेजल खोत , साक्षी दाभोळकर , मनिषा भोंडवे व प्राजक्ता एरंडोले तसेच मा. श्री ध. कि. चव्हाण (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा गोरेगाव वांगी) व सौ शुभांगी जाधव (सरपंच, गोरेगाव वांगी) तसेच श्रीकांत माने( उपसरपंच गोरेगाव वांगी )आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले . दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन शिंदे व प्रा. व्ही.व्ही. माने तसेच विविध विषयतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.