खटाव :-गोरेगाव (वांगी )येथे युनिटी बिल्डर्स कराड यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्यांच्या घरात पाणी.
प्रतिनिधी:- सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

प्रेस नोट *गोरेगाव(वांगी) येथे युनीटी बिल्डर्स कराड यांच्या नाकर्ते पणामुळे सर्वसामान्यांच्या घरात पाणी* दि-३जुलै२०२२ युनीटी बिल्डर्स कराड यांनी मा.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून PWD अंतर्गत शामगाव घाट ते गोरेगाव(वांगी) मार्गे गणेशवाडी अश्या मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे काम केले आहे तरी सदर रस्त्याचे काम गोरेगाव पर्यंत पूर्ण झाले आहे मात्र त्या रस्त्याच्या कडेला नाले काढले गेले नसल्याने सर्वसामान्यांच्या घरात पावसाचे पाणी घुसले आहे युनिटी बिल्डर्स चे सुपरवायझर मा.अमित टिके व मॅनेजर मा.शिंदे यांना गोरेगाव((वांगी) गावचे सरपंच शुभांगी जाधव यांनी व ग्रामस्थांनी वारंवार फोन करून नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी विनंती केलेली आहे मात्र संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास RPS प्रेस रिपोर्टर असोसिएशन खटाव तालुका अध्यक्ष सौरभ चव्हाण व गोरेगाव (वांगी) गावचे नागरिक यांच्या वतीने PWD कार्यालय वडूज येथे युनिटी बिल्डर्स कराड व संबंधित अधिकाऱ्यांन विरोधात आंदोलन करण्यात येईल.