कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी येथे बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा मायणी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथे बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मायणी.

प्रतिनिधी
मायणी तालुका खटाव येथील भिसेवस्ती, शिंदेवाडी आणि बदाचा मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना स्वतःच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गेले अनेक दिवस मायणी परिसरात बिबट्या आल्याची चर्चा होत होती परंतु प्रत्यक्षात कोणालाही बिबट्याचे दर्शन झाले नाही.मात्र शुक्रवारी रात्री मायणी शिंदेवाडी येथील अविनाश शिंदे,संदीप शिंदे,लक्ष्मण काळे या युवकांना रात्री ११:४५ वाजता त्या बिबट्याचे दर्शन झाले आणि त्याचा व्हिडिओ काढला गेला आणि त्यांनीच तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
येथील फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली व वन अधिकारी रामदास घावटे यांना या बिबट्या संदर्भात माहिती दिली.त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी भिसेवस्ती, शिंदेवाडी आणि बदाचा मळा व वन विभागाचा परिसर पाहिला असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले.त्यानुसार वनविभागाला बिबट्या असल्याची खात्री पटली.
यावेळी वन अधिकारी रामदास घावटे यांनी परिसरातील लोकांची चर्चा करून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बिबट्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी खालील गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.
शेतात किंवा निर्जन ठिकाणी एकटे जाणे टाळा,नेहमी समूहाने फिरा,शेतात काम करताना किंवा चालताना मोठ्याने बोला किंवा आवाज करा, घराबाहेर पडताना हातात मोठी काठी आणि बॅटरी सोबत ठेवा, पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाणे पूर्णपणे टाळा, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. संध्याकाळी त्यांना घरातच ठेवा, घराच्या आणि गोठ्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडीझुडपे तात्काळ कापून टाका, जनावरांचे गोठे बंदिस्त करा. रात्री गोठ्यात प्रकाश सुरू ठेवा, रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर आणि अंगणात पुरेसा प्रकाश ठेवा, संशयास्पद काही आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा.

मायणी : येथील लोकांना माहिती देताना वन अधिकारी रामदास घावटे, संतोष गलांडे,पोलीस पाटील प्रशांत कोळी.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button