महाबळेश्वर वाडा कुंभरोषी येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य सभा घोषणा करणाऱ्यांना जनता नाकारतेय – शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे विकासाची गॅरंटी.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर वाडा कुंभरोषी येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य सभा घोषणा करणाऱ्यांना जनता नाकारतेय – शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे विकासाची गॅरंटी.

महाबळेश्वर येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जाहीर सभेने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापवले. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत शिंदे साहेबांनी थेट शब्दात सांगितले — “महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही!”
महाबळेश्वर तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन विकास, मूलभूत सुविधा यासाठी सरकारने भरघोस निधी दिला असून पुढेही निधीचा ओघ थांबणार नाही, असा ठाम विश्वास शिंदे साहेबांनी दिला.
तरुणांचा रोजगार हा माझा प्राधान्यक्रम असून महाबळेश्वर तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. याचबरोबर महाबळेश्वर येथे भव्य संविधान भवन उभारणारच असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले — “मी मुख्यमंत्री झालो ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच.”
लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करत सध्या १५०० रुपयांचा लाभ २१०० रुपये करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. ही घोषणा ऐकताच सभास्थळी प्रचंड जल्लोष उसळला.
यावेळी मा. आमदार दगडू दादा सपकाळ तसेच तालुक्यातील मान्यवरांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवसेना उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. महाबळेश्वरच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करण्यात आले.
महाबळेश्वरचा विकास थांबवायचा नाही तर शिंदे साहेबांच्या शिवसेनेलाच साथ द्यावी लागेल — हेच या सभेतून स्पष्ट झाले!

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
पत्रकार- उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाअध्यक्ष



