पुसेसावळी गणामधून रयत क्रांती पक्षाकडून सौरभ प्रल्हाद चव्हाण निवडणूक रिंगणात; शेतकरी व सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुसेसावळी गणामधून रयत क्रांती पक्षाकडून सौरभ प्रल्हाद चव्हाण निवडणूक रिंगणात; शेतकरी व सर्वसामान्यांचा वाढता पाठिंबा.

पुसेसावळी (ता. खटाव) – आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी पुसेसावळी गणामधून रयत क्रांती पक्षाकडून सौरभ प्रल्हाद चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले सौरभ चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत.
रयत क्रांती पक्षाने जमिनीवर काम करणाऱ्या, जनतेशी थेट नातं असलेल्या उमेदवारावर विश्वास दाखवत पुसेसावळी गणातून सौरभ चव्हाण यांना संधी दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, शेतीमालाला योग्य दर, युवकांचे प्रश्न, आरोग्य व मूलभूत सुविधा यांसाठी त्यांनी याआधीही अनेक वेळा आवाज उठवला आहे.
त्यांच्या उमेदवारीला रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सचिन नलावडे आबा, सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे. यासोबतच पुसेसावळी गणातील स्थानिक शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सौरभ प्रल्हाद चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“ही निवडणूक माझ्या वैयक्तिक विजयासाठी नसून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे. रयत क्रांती पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी संकल्प केला आहे.”
दरम्यान, रयत क्रांती पक्षाच्या या उमेदवारीमुळे पुसेसावळी गणातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होत असून राजकीय वातावरण तापले आहे.




