पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून चोराडे गावच्या रिया सुभाष पिसाळ ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून चोराडे गावच्या रिया सुभाष पिसाळ ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात.

पुसेसावळी (ता.खटाव) – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून चोराडे गावच्या रिया सुभाष पिसाळ यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
चोराडे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या असलेल्या रिया सुभाष पिसाळ यांनी ग्रामीण जीवनातील अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे शेती, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या गटात सामान्य घरातून पुढे आलेल्या तरुण नेत्यााला संधी देत नव्या आणि जनतेशी जोडलेल्या नेतृत्वाचा संदेश दिला आहे. ‘घड्याळ’ या चिन्हावर होणाऱ्या या लढतीकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रिया पिसाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
“चोराडे गावासह पुसेसावळी गटातील प्रत्येक गावाचा विकास हेच माझे ध्येय आहे. घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवून सर्वसामान्य शेतकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच पुसेसावळी जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




