आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“गोड बंगाल सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोम कालवा घाणीत”

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-“गोड बंगाल सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोम कालवा घाणीत”

*”गोड बंगाल” सिंचन विभागाचा.! धोम डावा उजवा कालवा मरणासन्न अवस्थेत घाणीचे साम्राज्य शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मातीमोल.!*
सातारा वाई.
सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्याची तहान भागवणारे धोम धरण त्यावरील सिंचन व्यवस्थापन विभाग नक्की काम तरी करतोय काय? याचे दैनिय चित्र धोम धरण डावा उजवा कालवा यामध्ये वरोंवार दिसून येत आहे. धोम धरण डावा उजवा कालवा अवस्था फारच बिकट झाली आहे हे धोम धरणाचे कालवे आहेत की घाणीच्या सांडपाण्याचे नाले आहेत हे समजने अवघड होत आहे कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत मृत अवस्थेतील प्राणीही यात पडलेले असतात अनेक ठिकाणी कालव्यांची खराब अवस्था आहे अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडून शेतकऱ्यांचे हक्कांचे हजारों लांखो लिटर पाणी मातीमोल होताना दिसत आहे.
दोन्ही कालव्यात घाण गाळ मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. *निधीचा गोड बंगाल आहे तरी काय.* दर वर्षी मोठ्या प्रमाणात या कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी लांखो करोडचा निधी मंजूर केला जातो मात्र प्रत्यक्षात तो निधी जातो कुठे त्याची कामेही तशी प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. कामाची टेंडर कागदावर दिसतात खरी मात्र सिंचन विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या आपसी मताने निधी जातोय कुठे हे कळणे ही अवघडच आहे. ठेकेदार फक्त नाममात्र ठिगळे लिपण्याची कामे करताना दिसून येतात ती ही कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे केली जात आहेत त्या कामाची मटेरियलची गुणवत्ता ही एकदम खालच्या थराचीच असते आठ दिवसा नंतर जेसे थे अशीच असते. धोम धरण *सिंचन विभागाचे “काय गोड बंगाल”* याची चर्चा मात्र दिवसेंदिवस शेतकरी वर्गात रंगत आहे कालवे फुटल्याने हजारो हेक्टर शेतजमीनचे नुकसान होत आहे लाखों लिटर पाणी वाया जात आहे वेळवर पाणीपट्टी भरून सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचा भुर्दंड ही शेतकरयांनाच सोसावा लागत आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर येणाऱ्या काळात पाणी कमतरतेच्या खूप मोठ्या समस्यांना सामोरे लागणार हे मात्र नक्कीच आहे यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button