आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई /कळंबोली:-नवी मुंबई येथे सावित्रीमाई जयंतीदिनी समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक ढोक झाले सन्मानित !!!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नवी मुंबई येथे सावित्रीमाई जयंतीदिनी समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक ढोक झाले सन्मानित !!!

मुंबई /कळंबोली – श्री .संत सावतामाळी समाज विकास मंडळ, कळंबोली, नवी मुंबईचे वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त सत्यशोधक चळवळीचे पुणे येथील कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांचे शुभहस्ते शनिवार दि.3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता न्यू सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या भव्य ग्राऊंडवर मोमेंटो शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा सन्मान करताना त्यांची पत्नी सत्यशोधिका आशा ढोक यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, उपमुख्यमंत्री स्वीकीय सहाय्यक धीरज अभंग ,फॉरेन्स लॅब पुणे चे अधिकारी विशाल पांढरे , वर्ल्ड बँक मंत्रालय चे व्यवस्थापक प्रवीण वानखेडे , वक्त्या मोनिका काळे, सावता महाराज वंशज रविकांत वसेकर महाराज, प्रभु महाराज माळी, जे. के.कुदळे,उपस्थितीत होते .

सत्यशोधक रघुनाथ ढोक हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धा, मुहूर्त, कर्मकांड आणि जातीभेदापलीकडे जावून गेली गेली 34 वर्षे सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश तसेच जाती निर्मलून साठी जात विरहीत कामकाज विनामूल्य करीत असतात त्यांचे कार्य महाराष्टपुरते सिमित नसून ते तेलंगणा, राजस्थान , हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, आग्रा,सोबत नेपाळ देशात देखील सत्यशोधक चळवळीचे कार्य करीत अनेक पुरस्कार मिळविले आहेत.त्यांनी अनेक महापुर्षांवर विविध भाषेत पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते नोकरी करीत समाजकार्य करीत आहे म्हणून आज आम्ही समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करीत असल्याचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी मंचावरून माहिती दिली.

सत्कारास उत्तर देताना ढोक म्हणाले की थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवताना मी फक्त एक वसा सत्यशोधक चळवळीचा धागा म्हणून पुढे नेला तर एवढा सन्मान सर्वत्र होतो आहे तर मग फुले दांपत्य यांनी 18 व्या शतकात विविध प्रकारचे केलेले क्रांतिकारी कार्य व त्यांचे विचार आणि सोबत गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, अर्धांग वायू झाला असताना देखील लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ व इतर अनेक ग्रंथ लिहून अलौकिक केलेले कार्य आणि विशेष म्हणजे भारताचे संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरू मानतात याचा अर्थ ते किती महान होते याचा सर्वांनी विचार करावा.त्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचे कृतिशील विचार ,कार्य पुढे नेऊन फुले दांपत्याचा सन्मान करू या असे देखील ढोक यांनी प्रतिपादन केले.

आमदार प्रशांत ठाकूर प्रतिपादन करताना म्हणाले की गेली 18 वर्ष हे समाज मंडळ दरवर्षी भरगच्च कार्यक्रम घेत असून गुणवंत विद्यार्थी सोबत विविध प्रकारचे कार्य करणारे महिला , पुरुषांचा सन्मान करून त्यांना व इतरांना प्रेरणा देण्यासाठी मदत करीत आहेत असे गौरवदगार काढीत लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर मंडळासाठी भुखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र मोकल,प्रास्ताविक, स्वागत ॲड.श्रीनिवास क्षीरसागर आणि आभार अध्यक्ष नितीन जाधव यांनी मानले सोहळा,ग्रंथ दिंडी, भव्य मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उद्धवराव भुजबळ,सतीश आणि बाबा ढोक ,नवनाथ घनवट,शंकर हजारे, नाळे क्लासेस,कामोठे,श्री.धनलक्ष्मी महिला गृह उद्योग तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी , सभासद यांनी मोलाची मदत केली तर यावेळी खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button