वाई:-सत्तेतून थेट विकास! नागेवाडीत १० लाखांचा काँक्रेटी रस्ता — कामाला गती, गावाला दिशा!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा. 🙏🏻
1) सत्तेतून थेट विकास! नागेवाडीत १० लाखांचा काँक्रेटी रस्ता — कामाला गती, गावाला दिशा!

वाई तालुका | नागेवाडी
नुसती घोषणा नाही, थेट काम—अशा ठाम भूमिकेतून मौजे नागेवाडी येथे ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रेटीकरणाचा श्रीफळ वाढवून जोरदार शुभारंभ करण्यात आला. दिपक दादा ननावरे यांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या विशेष निधीतून १० लाख रुपये मंजूर करून विकासाला गती देण्यात आली.
शुभारंभप्रसंगी काम दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या ठोस सूचना देण्यात आल्या. हा रस्ता पूर्ण होताच ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य व दैनंदिन वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असून, पावसाळ्यातील गैरसोयी इतिहासजमा होणार आहेत.
विकास बोलतोय, नागेवाडी बदलतेय!
या निर्णायक पावलाबद्दल नागेवाडी ग्रामस्थांनी दिपक दादा ननावरे व मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानत, “काम दिसतंय, विश्वास वाढतोय” अशी भावना व्यक्त केली.
2) किसनवीर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रभावी मार्गदर्शन.

वाई | प्रतिनिधी
किसनवीर महाविद्यालय, वाई येथे २४ डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ग्राहक हक्क व संरक्षण कायद्याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे जिल्हा अध्यक्ष व प्रांत विभाग प्रमुख ॲडव्होकेट श्री. तुषार झेंडे पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत साध्या व सोप्या भाषेत ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क व दैनंदिन व्यवहारातील सावधगिरी याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. गुरुनाथ फगरे सर होते. यावेळी प्रांत महिला सहप्रमुख सौ. शुभदा नागपूरकर, वाई तालुका अध्यक्ष श्री. राहुल जायगुडे, प्रा. श्री. संदीप पातुकडे, प्रा. सौ. दिपाली चव्हाण मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सातारा जिल्हा सचिव श्री. किशोर फुले, प्रांत सृजन व रोजगार प्रमुख श्री. सतीश जेबले, जिल्हा मार्गदर्शन सेवा केंद्र प्रमुख श्री. बाळासाहेब कोलार, वाई तालुका उपाध्यक्षा सौ. सविता चव्हाण, वाई तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल भोज, सदस्य श्री. मोहन सूर्यवंशी यांचीही उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. पातुकडे सर यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा. दिपाली चव्हाण मॅडम यांनी मांडले, तर कार्यक्रमाचा समारोप प्रा. पवार सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढून जबाबदार ग्राहक घडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
3) वाईत स्वसंरक्षणाची ठाम सुरुवात!
माननीय नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या शुभहस्ते
तायक्वांदो | कराटे | मार्शल आर्ट प्रशिक्षण वर्गांचा अधिकृत प्रारंभ!

दि. ०१/०१/२०२६ पासून
स्थळ : नगरपालिका शाळा क्रमांक ०१, वाई
वेळ : सकाळी ठिक १०.३० वाजता
स्वसंरक्षण शिकणे ही गरज आहे, पर्याय नाही!
विद्यार्थी, पालक व युवक–युवतींसाठी आवश्यक प्रशिक्षण!
समस्त वाईकर नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग व सहकारी मित्र–मैत्रिणींनी उपस्थित राहून या उपक्रमाला ठोस पाठिंबा द्यावा.
सुरक्षित व सक्षम वाईसाठी एक पाऊल पुढे!




