कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवणार-पंकज आशिया (जिल्हाधिकारी अहिल्यानगर)

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवणार-पंकज आशिया (जिल्हाधिकारी अहिल्यानगर)

पारनेर-(राजकुमार इकडे)
*शासननिर्णयांच्या अंमलबजावणीसाठी शिव पाणंदचा सातत्यपूर्ण पठपुरावा – शरद पवळे(प्रणेते, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)*
शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धीचा नारा देत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण शिव रस्त्यावरून सुरू झालेली शिव पाणंद चळवळ राज्यात ऐतिहासिक”पेरू वाटप” आंदोलनामुळे लक्षवेधी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या ६० दिवसांत रस्ता देण्याच्या आदेशामुळे न्यायालयीन बळ मिळाल्यामुळे विविध तालुक्यात जिल्ह्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले सरकारेही शिव पाणंदच्या मागण्यांची दखल घेत विविध मागण्या मान्य केल्या परंतु त्याची अंमलबजावनी होत नसल्यामुळे पुन्हा मुंबई मंत्रालय येथून चळवळीने नागपूर अधिवेशनात पुरू वाटपचा ईशारा देताच सरकारने तातडीने नव्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची घोषणा करत शासननिर्णय काढला याच धर्तीवर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहावर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची पारदर्शक अंमलबजावनी अहिल्यानगर जिल्ह्यात करावी या संदर्भात रस्त्यासाठी लागणारी निशुल्क मोजणी आणि पोलिस बंदोबस्त, सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून मजबुतीकरण करणे, गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी शेतरस्त्यांसाठी १००% यंत्रसामग्रीचा वापर,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण,दगडी नंबरी लावणे, गाळ, माती, मुरूमासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारू नये, झिरो पेण्डसी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना चळवळीच्या वतीने देण्यात आले जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सहानुभुतीपूर्वक संवाद साधत तातडीने सबंधित विभागांना आदेश देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधुन आलेल्या प्रत्येक शेतकराऱ्याचे निवेदन पाहून स्वतः फोटो काढून संबंधित विभाच्याअधिकाऱ्यांना फोटो पाठवत शेतकऱ्यांची सहानुभुतीपूर्वक संवाद साधत शेतकऱ्यांची मने जिंकली यावेळी शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देत साहेबांचा सन्मान केला यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील, सुरेश वाळके, रविंद्र खुडे,पोपट शेळके,बाळासाहेब थोरात,सचिन शेळके,अशोक कचरे,,संजय साबळे, भाऊसाहेब वाळूंज,बबन गुंड,दशरथ वाळूंज,विठ्ठल निर्मळ,आशाबाई वाघ, उषाताई हुके,कानिफ कदम,प्रशांत चौधरी आदिंसह विविध तालुक्यातील शिवपाणंद चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट- अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी झालेल्या यशस्वी पेरू वाटप आंदोलनानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर जिल्हाधिकारी पंकज अशिया यांची कार्यकुशलता पा हुन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल-शरद पवळे (प्रणेते, महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button