क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड :- लोकनियुक्त सरपंचाच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चित — गुन्हेगारांवर न्यायाचा पहिला घाव.

पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

बीड :- लोकनियुक्त सरपंचाच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चित — गुन्हेगारांवर न्यायाचा पहिला घाव.

लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या बीडमधील मासाजोगे गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अखेर न्यायाने आपला पहिला कठोर हात उगारला आहे.
या खळबळजनक हत्येप्रकरणी विशेष मकोका न्यायालयाने वल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित करत, गुन्हेगारांना थेट कटघऱ्यात उभं केलं आहे.

अपहरण, अमानुष मारहाण आणि थंड डोक्याने करण्यात आलेला हा खून म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नाही, तर लोकशाही, ग्रामस्वराज्य आणि जनतेच्या विश्वासाचा खून असल्याची भावना आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याच्या चर्चांनी वातावरण तापलं असताना, आजचा न्यायालयीन निर्णय म्हणजे कायद्यापुढे कुणीही मोठं नाही याचा ठळक इशारा आहे.

न्यायालयाने तपास यंत्रणांचे ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गुन्ह्याची भीषणता लक्षात घेत, आरोपींना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या प्रकरणात आता खऱ्या अर्थाने न्यायाची लढाई रंगणार आहे.

आजचा निर्णय म्हणजे बीडमधील दहशत, माज आणि गुन्हेगारी प्रवृत्तील दिलेला थेट इशारा आहे. लोकप्रतिनिधींवर हात उचलणाऱ्यांना पाताळात गाडल्याशिवाय राज्य स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button