वाई:-रब्बी ज्वारी उत्पादनासाठी कृषी विभागाचा मोठा पुढाकार.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रब्बी ज्वारी उत्पादनासाठी कृषी विभागाचा मोठा पुढाकार.

रब्बी ज्वारी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने मोठा पुढाकार घेतला असून, शेतकऱ्यांना योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय शेती पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी श्री. हरिश्चंद्र धुमाळ यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२५–२६ अंतर्गत आयोजित रब्बी ज्वारी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथील विषय तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान, सुधारित वाण, खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. भविष्यातील शेती नियोजनावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
सहाय्यक कृषी अधिकारी श्री. तानाजी यमगर यांनी ऊस पिकाबाबत उपयुक्त माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी श्री. रविंद्र बेलदार यांनी महाविस्तार AI ॲपची माहिती देत अधिकाधिक शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करून आधुनिक कृषी सल्ल्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश वंजारी यांनी केले. कार्यक्रमास उपकृषी अधिकारी श्री. निखिल मोरे, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन तसेच पाचवड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




