कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी सरप्राईज भेट -डॉ. श्रीपाद पाटील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा ; उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या आश्वासन.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी सरप्राईज भेट -डॉ. श्रीपाद पाटील
उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा ; उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या आश्वासन.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी सरप्राईज भेट -डॉ. श्रीपाद पाटील
उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा ; उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल
कणकवली :
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवेबाबत सर्व विभागांना भेट देवून पाहणी केली. स्वच्छता , बाह्यरुग्ण तपासणी , अन्य आरोग्य सुविधा , रुग्णवाहिका सेवा याबाबत सुधारणा करण्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा केली. सीटीस्कॅन मशीन बंद आहे कारण त्या मशीनचे अद्यावतीकरण चालु आहे. ते लवकरच चालु होईल. तसेच एक्सरेच्या प्रिंटींग मशीनचेही काम केले जाईल. रिक्त पदे भरण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी सरप्राईज भेट दिल्याची माहिती , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी डॉ. श्रीपाद पाटील यांनी सरप्राईज भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिक्षक डॉ. पंकज पाटील , निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे , डॉ. तुषार चिपळूनकर , डॉ. विशाल रेड्डी , सहाय्यकक अधिसेविका एस . एस . तिवरेकर , राजेश पारधी , निलेश गावडे . डॉ. साळुंखे , प्रशांत बुचडे , अशोक रणदिवे , श्री. कुडतरकर आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
शासनाने संपूर्ण राज्यात वैद्यकीय अधिक्षक भरती करण्यासाठी 1440 पदांची जाहिरात काढलेली आहे. सोनोग्राफी करण्यासाठी व्हिडिओलॉजिस्ट एकच असल्यामुळे अन्य रुग्णालयांचा पदभार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 1 दिवस सेवा देतात. अधिकची उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात संवादाचे वातावरण निर्माण व्हावेत , या दृष्टीने सुचना दिलेल्या आहेत. 9 सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षक हे वैभववाडी , देवगड याठिकाणी कार्यररत आहेत. तिकडटे सुरक्षा रक्षक भरल्यानंतर या ठिकाणी वाढ केली जाईल.
बॉक्स –
आपल्या चुकांमुळे दुदैवी घटना घडू नयेत – डॉ. श्रीपाद पाटील
रुग्णांची बाह्य रुग्ण तपासणी वाढावी . तसेच अन्य विभाग पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सक्षम व्हावेत , याबाबत काही अडचणी आहेत का ? याची चर्चा केली. सर्व विभागांमध्ये असलेले सौचालय स्वच्छ आहेत का ? याची पाहणी केली. रुग्णवाहिका ऑनरोड राहण्यासाठी काळजी घ्यावी . कर्मचा-यांचे पेमेंट वेळेत करावेत , चुकीच्या पध्दतीमुळे घटना आपल्या चुकांमुळे होवू नयेत अशी काळजी घ्या , या सुचना दिलेल्या आहेत , असे डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.




