वाई:-आरोग्यासाठी वाईकरांची एकजूट.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आरोग्यासाठी वाईकरांची एकजूट.
नमस्कार…
मी सारिका गवते,
RPS Star News मध्ये आपले स्वागत.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि वेळेवर निदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाई यांच्या वतीने २० डिसेंबर रोजी रोटरी रन व मोफत कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून वाई शहर व तालुक्यातील नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येणार असून, आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला जाणार आहे. कॅन्सरविरोधात लढ्याचा ठोस संदेश देत ही जनजागृती रॅली आणि रोटरी रन आयोजित करण्यात येत आहे.
रोटरी रननंतर आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध कॅन्सर तपासण्या केल्या जाणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता अधिक असते; मात्र माहितीअभावी किंवा दुर्लक्षामुळे अनेक रुग्ण उशिरा उपचार घेतात.
ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वाईने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला असून, नागरिकांनी कोणताही संकोच न ठेवता या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाई शहर व तालुक्यातील महिलांनी या कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचा लाभ घ्यावा, तसेच सर्व वाईकरांनी या जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाच्या मुख्य स्वाती हेरकळ, माजी रोटरी प्रांतपाल ३१३२, तसेच रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष रो. कुणाल शहा आणि सचिव अनुपम गांधी यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे वाई शहरात आरोग्य जागृतीचा नवा संदेश पोहोचत असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण या माध्यमातून दिसून येत आहे.




