कराड:-स्व.शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

स्व.शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न.

कराड : येथील स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत दि. ५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत शालेय वार्षिक क्रीडा सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला. या क्रीडा स्पर्धांचा सांगता समारंभ दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कराड हे उपस्थित होते. प्रशालेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत मान्यवरांचे स्वागत केले. क्रीडा विभागप्रमुख डॉ. श्री. महेंद्र भोसले सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. आपल्या प्रेरणादायी भाषणात माननीय श्री. अशोक भापकर सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलींना प्रशासकीय सेवेसह विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र त्या संधींचा लाभ घेताना प्रथम आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तसेच समाजमाध्यमांचा विवेकपूर्ण आणि सकारात्मक वापर करण्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. सी. एन. कुंभार मॅडम, पर्यवेक्षिका सौ. सुनीता अवघडे मॅडम, संस्था नियुक्त पर्यवेक्षक श्री. जगदीश कुंभार सर, कार्याध्यक्ष सौ. मीनाली भोसले मॅडम व उपकार्याध्यक्ष श्री. अमृत गिजरे सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल थोरात सर यांनी केले. समारोपप्रसंगी उपकार्याध्यक्ष श्री.अमृत गिजरे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व सर्व सहभागी विद्यार्थिनींचे आभार मानले.




