खटाव:-मायणी गाव भविष्यात अध्यात्मिक शक्तीचे केंद्र होणार- सुखदेव शिंदे
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मायणी गाव भविष्यात अध्यात्मिक शक्तीचे केंद्र होणार- सुखदेव शिंदे

मायणी प्रतिनिधी
मायणी ता.खटाव येथील श्री.सदगुरू यशवंतबाबा भजनी मंडळाची श्री. विष्णुपद दर्शन व स्नेहभोजन सहल उत्साहात पार पडली.यावेळी पंढरपूर येथील श्री विष्णुपद दर्शन व स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.सद्गुरू यशवंतबाबा भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री.सुखदेव शिंदे म्हणाले की,मायणी गाव हे महान संत श्री.सद्गुरू यशवंतबाबा यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.या गावातील सर्व भाविक अध्यात्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात श्री.सद्गुरू यशवंतबाबा आषाढी पालखी सोहळ्यात तन,मन, धनाने सहभागी होतात.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.भविष्यात मायणी गाव हे एक आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक असलेले केंद्र होणार यासाठी सर्व भाविक ग्रामस्थांनी भजनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहनही शिंदे यांनी केले.
यावेळी भजनी मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब यलमर,संचालक दशरथ माळी,सुनील पिटके,चोपदार बबन शिंदे,किसन सुतार,आनंदा नायकुडे,पांडुरंग माने, दादासाहेब मासाळ,सचिव धनाजी माने,आबासो माने मुंबई पोलीस राम थोरात तसेच मायणी रहाटणी डोणमळा येथील सर्व यशवंतबाबा भक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सर्वांचे आभार मानताना बंडाभाऊ माने म्हणाले की, श्री.सदगुरू यशवंतबाबा भजनी मंडळाने नेहमीच वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन नेहमीच यशस्वी प्रयत्न केला आहे.भविष्यात मायणीत भव्य दिव्य आध्यात्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व भाविक ग्रामस्थांनी एकसंघ रहावे.यावेळी काल्याचा अभंग होऊन सर्वांची शिदोरी एकत्रितपणे करून स्नेहभोजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.




