वाई:-पारंपरिक पिकांना आधुनिकतेची जोड द्यावी – श्री बरकडे
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पारंपरिक पिकांना आधुनिकतेची जोड द्यावी – श्री बरकडे

वाई: रब्बी ज्वारी गहू हरभरा यासारख्या पारंपारिक पिकांना नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिकतेची जोड देऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच या पिकांना उद्योजकतेची जोड देण्यात यावी असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी केले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2025 26 अंतर्गत मौजे कणूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण वेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळताना कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्मअन्नप्रक्रिया उद्योग या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन श्री बरकडे यांनी केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ संग्राम पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी संग्राम पाटील यांनी रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीविषयी सखोल माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. सहाय्यक कृषी अधिकारी तानाजी यमगर यांनी यावेळी ऊस पिकाविषयी सखोल माहिती दिली. हरिश्चंद्र धुमाळ यांनी कृषी विभागाच्या महाविस्तार AI ॲप विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा असे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उप कृषी अधिकारी श्री निखिल मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले, सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रशांत सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी श्री अजय राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी कार्यवाही अधिनस्त सर्व कर्मचारी, सरपंच, उप, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सोसायटी आजी-माजी चेअरमन व गावातील शेतकरी उपस्थित होते.




