गोंदेगाव निफाड :-सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांना गोईरत्न पुरस्कार देऊन सन्मान.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांना गोईरत्न पुरस्कार देऊन सन्मान.

गोंदेगाव ता निफाड येथे ग्रामविकास मंच व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गोईरत्न हा पुरस्कार विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उलेखनिय योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा गोई रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कर्मवीर वसंतराव नारायण नाईक गोंदेगांव येथील माध्यमिक विद्यालय गोंदेगांव येथे १४ डिसेंबर रोजी पर पडला या सोहळ्यात लासलगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.किरण साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
तर या प्रसंगी मा.शिवा भाऊ सुराशे, निवृत्ती भाऊ जगताप,तसेच पोलिस हवलदार नाईकवाडे साहेब यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.
मा.महेशजी मेथे सर व त्यांच्या सहकार्याच्या
संकल्पनेतुन २०१६ या वर्षापासून गोईरत्न पुरस्कार हा गो ई नदी काठच्या गावांतून सामाजिक, शैक्षणिक ,पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातून योगदान देणाऱ्या यक्तीनां गोईरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
समाजाला नवीन प्रेरणा मिळावी ह्या हेतूने गोईरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येते. समाजात नवनवीन बदल होतील
****गोईरत्न पुरस्कार या वर्षीचे मानकरी ****
१) पंडित त्र्यंबक मुदगुल – डिजीटल मिडीया (उत्कृष्ट छायाचित्रकार)
२)जयंत गंगाधर टक्के – वैद्यकीय व सामाजिक क्षेत्र
३) देविदास पंडित दिघे- अध्यात्म
**** विशेष सेवा पुरस्कार मानकरी****
बळीराम दिनकर नाईक – सार्वजनिक वाचनालय सेवा
विकास पोपट भोसले – गड, किल्ले संवर्धन
नितीन रत्नाकर निकम-महावितरण सेवा
चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे -लेखन व पत्रकारिता
भाऊसाहेब बाबुराव वैद्य – समाज प्रबोधन
तसेच या सोहळ्यात – ग्रामपंचायत समिती पदाधिकारी गोंदेगाव , शांताराम कांगणे ,रज्जाक पठाण, ज्ञानेश्वर भडांगे,शरद भडांगे, विष्णू कांगणे, सुधाकर साळवे, दशरथ आहेर व ग्रामस्थ उपस्थित होते.




