सातारा:-#नौसेना माजी सैनिक शंकर माळवदे यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नौसेना माजी सैनिक शंकर माळवदे यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान…
सातारा दि: सातारा शहरातील सामाजिक, राजकीय व साहित्यक आणि उद्योग क्षेत्रात नौसेना दलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर चमकदार कामगिरी करणारे माजी नौसैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष सातारा शहर नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष श्री शंकर माळवदे यांचा सत्कार करण्यात आला.
नौ सेनेतून बऱ्याच वर्षापूर्वी ते सेवानिवृत झाले होते.सेवानिवृत्तीनंतर विविध क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती.त्याची उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली. याबद्दल अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.
आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील ,जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ.यशानी नागराजन ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील ,आजी-माजी सैन्य अधिकारी ,सैनिक वीर माता – पिता – नारी यांच्या उपस्थितीत श्री माळवदे यांचा सत्कार करण्यात आला.
नौ सेनेत कार्यरत असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीत श्री शंकर माळवदे यांनी दक्षिण ध्रुव अंटार्टिका येथे एका शास्त्रज्ञाचा प्राण वाचवला होता . त्यावेळी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी १९८७ रोजी त्यांना शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते. .सेवानिवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्य व उद्योग क्षेत्रात सुरुवात केली. सातारा शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले .त्यांच्या कार्यकाळात आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविणे तसेच घरपट्टी माफ करणे. सातारा जिल्ह्यात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मरणार्थ युद्ध स्मारक बांधणे .आजी-माजी सैनिकांचे मुला-मुलींचे वस्ती गृह सुविधा पुरवणे, मिल्ट्री पॉली क्लिनिक येथे सेवा पुरवणे ,मिलिटरी कॅन्टीनला सुविधा देणे ,तसेच आम जनतेच्या ब सत्ता प्रकारच्या मिळकतीबद्दल आवाज उठवला होता.
शासनाचा शिक्का काढणे, गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे, महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणे साहित्यिक क्षेत्रात योगदान देणे अशा विविध कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्याची गतिमान महाराष्ट्र शासनाने
दखल घेऊन त्यांना आज सैनिक कल्याण विभागा मार्फत विशेष गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला.
या पुरस्काराबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, सर्व लोकप्रतिनिधी व सातारा नगरपालिका प्रशासन व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




