नवी दिल्ली:-लिओनेल मेस्सीचा भारत दौरा – फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह.
पत्रकार प्रमोद काळे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

लिओनेल मेस्सीचा भारत दौरा – फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह.

जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडू आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा क्रीडाविश्वात सुरू आहे. G.O.A.T (Greatest Of All Time) टूर अंतर्गत मेस्सी कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्ली या प्रमुख शहरांना भेट देणार असून भारतीय चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहेत.या दौऱ्यामुळे देशभर फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या दौऱ्यादरम्यान मेस्सी विविध फॅन मीट्स, सार्वजनिक कार्यक्रम आणि विशेष क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.तसेच त्यांची क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे.या भेटीमुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडाजगतातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय फुटबॉलसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, विशेषतः युवा खेळाडूंना यामुळे मोठी प्रेरणा मिळणार आहे.कोलकाता,मुंबई,हैदराबाद आणि दिल्लीमध्ये होणारे कार्यक्रम भारतातील फुटबॉल संस्कृतीला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे ठरतील असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.




