कराड:-राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शिक्षण मंडळ कराडमध्ये गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शिक्षण मंडळ कराडमध्ये गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.

कराड:- पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राचे नेतृत्व करणारी शैक्षणिक संस्था म्हणून शिक्षण मंडळ कराडला ओळखले जाते. शिक्षण मंडळ कराड तर्फे 22 डिसेंबर “राष्ट्रीय गणित दिनाच्या” निमित्ताने विविध शालेय गटांमध्ये लोकमान्य टिळक आंतर शालेय गणित प्रश्नमंजुषा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर , सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले आहे.
सर्व स्पर्धा थोर भारतीय गणिती तज्ञ रामानुजन यांच्या जयंती दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता शिक्षण मंडळ कराड संस्थेच्या कार्यालयात संपन्न होणार आहेत. हे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.
स्पर्धेसाठी खालील प्रमाणे शालेय गट असणार आहेत…
गट क्रमांक 1- इयत्ता तिसरी ,चौथी
गट क्रमांक 2 -इयत्ता पाचवी,
सहावी
गट क्रमांक 3 – सातवी, आठवी
गट क्रमांक 4 – नववी, दहावी*
प्रत्येक गटात प्रत्येक इयत्तेतील एक याप्रमाणे दोन विद्यार्थी सहभागी होतील त्यांचा एक गट असेल.
उदाहरणार्थ तिसरी चौथी च्या गट क्रमांक एक मध्ये तिसरीचा एक विद्यार्थी आणि चौथीचा एक विद्यार्थी असेल.
स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये संपन्न होणार आहेत स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे
टप्पा क्रमांक एक
गटाप्रमाणे विद्यार्थ्यांची 25 गुणांची बहुपर्यायी प्रश्न असलेली लेखी परीक्षा होईल
ही परीक्षा 11 ते 12 या वेळेत संपन्न होईल. लेखी परीक्षेतून पहिले सहा गट पुढील स्तरासाठी अर्थात प्रश्नमंजुषासाठी पात्र ठरतील.
टप्पा क्रमांक 2
प्रश्नमंजुषेच्या तीन फेऱ्या होतील. या संदर्भातील सूचना नियम प्रश्नमंजुषा स्पर्धेपूर्वी सांगितले जातील. लेखी व प्रश्नमंजुषा क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित असेल.
स्पर्धेसाठी नियम व अटी
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क नाममात्र पंधरा रुपये असेल.
प्रत्येक शाळेत प्रत्येक गटातून दोन संघ पाठवता येतील
लेखी परीक्षा गटाने म्हणजेच गटातील दोन्ही स्पर्धकांनी एकत्रित सोडवायची आहे
स्पर्धकांनी वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे
सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल
प्रश्नमंजुषा स्पर्धेचे चार विजेते गट व दोन उत्तेजनार्थ गट निवडले जातील
विजेत्या गटाला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट दिले जाईल
पहिल्या चार गटांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असेल तर उत्तेजनार्थ गटांना सर्टिफिकेट दिले जातील
शाळांनी आपल्या गटांची नावे दिनांक 21 डिसेंबर 2025 पर्यंत शिक्षण मंडळ, कराड कृष्णाकाठ, प्रशासकीय कार्यालय, फायनल प्लॉट नंबर 222 मंगळवार पेठ, कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा 415 110 या पत्त्यावर पाठवावीत. अथवा टिळक हायस्कूल कराड मधील गणित अध्यापिका सौ मेघना भोसले किंवा स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला चे गणित अध्यापक श्री.बाळासाहेब देसाई यांच्याशी संपर्क साधावा.
मोबाईल नंबर.
8999945641
9421499693




